Join us  

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : कपिल देव यांच्यानंतर Ravindra Jadejaने केला भारतासाठी मोठा पराक्रम; टीम इंडियाचीही लय भारी कामगिरी

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) सातव्या विकेटसाठी आर अश्विनसह शतकी भागीदारी केली. या दोघांच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 11:12 AM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत यजमान भारताचे निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. रिषभ पंतच्या ९६ धावा आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४०० पार पल्ला ओलांडला. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) सातव्या विकेटसाठी आर अश्विनसह शतकी भागीदारी केली. या दोघांच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. जडेजाने आज असा विक्रम नोंदवला की जो फक्त कपिल देव ( Kapil Dev) यांनाच करता आला होता. अश्विननेही कसोटीतील १२वे अर्धशतक पूर्ण केले. 

रोहित व मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी दिली. पण, या दोघांना मोठी खेळी साकारता आली नाही. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला. विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने ८८ चेंडूंत  ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली. 

सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर रिषभ मैदानावरच हताश होऊन काही काळ बसला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे मनोधैर्य वाढवले, ड्रेसिंग रुममध्ये जाताना संघातील प्रत्येक खेळाडू उभं राहून त्याचं कौतुक करत होता. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावताना आर अश्विनसह ७व्य विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. या कसोटीत भारताच्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या ८ फलंदाजांनी डावात 25+ धावा करण्याचा पराक्रम फक्त चारवेळा झाला आणि त्यात भारताच्या या कसोटीचा समावेश झाला. अग्रवाल ( ३३), रोहित ( २९), विहारी ( ५८), कोहली ( ४५), पंत ( ९६), अय्यर ( २७), जडेजा ( ८९*) आणि अश्विन ( ५०*) ( It's only the fourth time the top eight batters have scores of 25+ in a Test innings )

जडेजाची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरीकपिल देव यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० + धावा आणि ४००+ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय ठरला. जडेजाने कसोटीत २१९५ धावा व २३२ विकेट्स, वन डेत २४११ धावा व १८८ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ३२६ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी १३१ कसोटीत ५२४८ धावा व ४३४ विकेट्स आणि २२५ वन डेत ३७८३ धावा व २५३ विकेट्स घेतल्या आहेत. ( Ravindra Jadeja became only 2nd Indian after Kapil Dev to Score 5000 runs & pick 400 Wickets in Intl Cricket)  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजाकपिल देवआर अश्विन
Open in App