Join us  

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Virat Kohliला कर्णधार रोहित शर्माने मैदानाबाहेर जाण्यास सांगितले, त्यानंतर जे घडले त्याने सर्वांचे मन जिंकले, Video  

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित करून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 2:54 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित करून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. विराट कोहलीची ( Virat Kohli) १००वी कसोटी अविस्मरणीय करण्याचा निर्धार संघाने केलाच होता. त्याच निर्धाराने प्रत्येक खेळाडूने खेळ केला. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. रिषभ पंतचे शतक हुकल्याने निराश झालेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर जडेजाने हास्य फुलवले. जडेजाने आर अश्विन व मोहम्मद शमी यांच्यासह ७ व्या व ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय संघ मैदानावर उतरला. पण, कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) विराटला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले आणि सर्वांना आश्चर्य वाटले. त्यानंतर जे रोहितने केले ते पाहून साऱ्यांची मनं जिंकली. 

पहिल्या दिवसाचा खेळ रिषभ पंतने गाजवला. त्याच्या ९६ धावांची भारताला मजबूत स्थितीत आणले. मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) यांचेही योगदान होतेच. दुसऱ्या दिवसाचा खेळ जडेजाच्या नावावर राहिला. त्याने  आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर  ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.  

मोहालीतील कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५१६ धावा केल्या होत्या. त्याआधी १९९७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९ बाद ५१५ ( डाव घोषित), १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ बाद ५०५ ( डाव घोषित) आणि २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९९ धावा केल्या होत्या.  

रोहित शर्माने विराटला का मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.. 

क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरल्यानंतर रोहित सीमारेषेजवळ थांबला. त्याने पुढे गेलेल्या विराटला मागे बोलावले आणि मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. विराटला गार्ड ऑफ ऑनर देण्याचे टीम इंडियाने ठरवले होते आणि विराट त्यासाठी तयार नव्हता. पण, रोहितने त्याला मनवले आणि बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर सघांने विराटला Guard of Honour दिला आणि अखेर विराटने रोहितला टाळी मारली.

पाहा Video 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App