Join us  

IND vs SL, 1st Test: विराट कोहली फलंदाजी करत असताना ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्माचे काय चालले होते, ते पाहा; Video Viral

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत यजमान भारताचे निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 10:47 AM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत यजमान भारताचे निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. रिषभ पंतच्या ९६ धावा आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४०० पार पल्ला ओलांडला. विराट कोहलीची ही १००वी कसोटी आहे आणि त्याने चांगला खेळही केली, परंतु पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना शतकासाठी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. विराट जेव्हा मैदानावर फलंदाजी करत होता, तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार रोहित शर्माच्या 'त्या' कृतीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

रोहित व मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी दिली. पण, या दोघांना मोठी खेळी साकारता आली नाही. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला. विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने ८८ चेंडूंत  ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली. 

सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर रिषभ मैदानावरच हताश होऊन काही काळ बसला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे मनोधैर्य वाढवले, ड्रेसिंग रुममध्ये जाताना संघातील प्रत्येक खेळाडू उभं राहून त्याचं कौतुक करत होता. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावताना आर अश्विनसह ७व्य विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

विराट फलंदाजी करत असताना रोहित ड्रेसिंग रुममध्ये त्याची कॉपी करत होता. 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहली
Open in App