IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : १७५ धावा अन् ९ विकेट्स, Ravindra Jadejaची अविस्मरणीय कामगिरी; भारताचा ऐतिहासिक विजय 

IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : सर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:15 PM2022-03-06T16:15:06+5:302022-03-06T16:17:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : India have defeated Sri Lanka by an innings and 222 runs, This is India's fifth biggest Test win | IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : १७५ धावा अन् ९ विकेट्स, Ravindra Jadejaची अविस्मरणीय कामगिरी; भारताचा ऐतिहासिक विजय 

IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : १७५ धावा अन् ९ विकेट्स, Ravindra Jadejaची अविस्मरणीय कामगिरी; भारताचा ऐतिहासिक विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : सर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविश्वसनीय कामगिरी केली. विराट कोहलीची ( Virat Kohli) १००वी कसोटी आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची ( Rohit Sharma) पहिली कसोटी Rockstar Ravindra Jadejaने अविस्मरणीय बनवली. भारतीय संघाने तीन दिवसांत एक डाव व २२२ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा या विजयाचा नायक ठरला. दुसऱ्या डावात आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. 


मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) व रिषभ पंत ( ९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली.  त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.  

श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चूका करण्यास भाग पाडले. प्रत्येक गोलंदाजासाठी रोहितने अचूक क्षेत्ररक्षण लावले होते आणि हे पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कौतुक केले. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमूथ करुणारत्न ( २८), चरिथ असलंका ( २९) व अँजेलो मॅथ्यूज ( २२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले.  भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून टीम इंडियाने त्यांना फॉलोऑन दिला. 


दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. आर अश्विनने तिसऱ्या षटकात श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू थिरीमनेला ( ०) बाद केले. रोहितने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. पहिल्या डावातील नायक पथून निसंका दुसऱ्या डावात कमाल करू शकला नाही. अश्विनने त्याला ६ धावांवर झेलबाद केले. या विकेटसह अश्विनने भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपिल देव यांच्यासह संयुक्तपणे ( ४३४) दुसरे स्थान पटकावले. अनील कुंबळे ६१९ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. मोहम्मद शमीने तिसरा  धक्का देताना दिमुथ करुणारत्नेला ( २७) बाद केले. 

धनंजय डी सिल्वा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी १०२ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी करताना भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा जडेजाने मौके पे चौका मारला. त्याने फिरकीच्या जाळ्यात धनंजयला अडकवले आणि श्रेयस अय्यरकडे सोपा झेल देण्यास भाग पाडले. धनंजय ३० धावांवर बाद झाला. टी ब्रेकनंतर जडेजाने एका षटकात पुन्हा दोन धक्के दिले आणि त्यात अश्विनच्या एका विकेटची भर पडली. अश्विनने या विकेटसह कपिल देव यांचा ४३४ विकेट्सचा विक्रम मोडला.

निरोशान डिकवेलाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. लसिथ इम्बुल्डेनियासोबत त्याने श्रीलंकेचा पराभव टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. पण, जडेजाने पुन्हा कमाल केली आणि त्याने लसिथला बाद केले. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना विश्व फर्नांडोला ( ०) बाद केले. अश्विनने अखेरची विकेट घेताना  श्रीलंकेचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळाला. डिकवेला ५१ धावांवर नाबाद राहिला.

Web Title: IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : India have defeated Sri Lanka by an innings and 222 runs, This is India's fifth biggest Test win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.