IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरी करताना भारताला पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव व २२२ धावांनी विजय मिळवून दिला. भारताच्या ८ बाद ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात १७४ आणि दुसऱ्या डावात १७८ धावाच केल्या. नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविश्वसनीय कामगिरी करताना दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेतल्या. विराट कोहलीची ( Virat Kohli) १००वी कसोटी आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची ( Rohit Sharma) पहिली कसोटी Rockstar Ravindra Jadejaने अविस्मरणीय बनवली.
मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) व रिषभ पंत ( ९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.
श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमूथ करुणारत्न ( २८), चरिथ असलंका ( २९) व अँजेलो मॅथ्यूज ( २२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. निरोशन डिकवेला ( नाबाद ५१) वगळता अन्य फलंदाजांनी नांगी टाकली. धनंजय डी सिल्वा ( ३०), अँजलो मॅथ्यूज ( २८) व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( २७) हे डिकवेलानंतर श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. आर अश्विनने ४७ धावांत ४, रवींद्र जडेजाने ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्माच्या नावावरील विक्रम
- १०० वी कसोटी जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण, हरभजन सिंग व इशांत शर्मा यांनी त्यांच्या १००व्या कसोटीत विजय मिळवला होता.
- रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून ४२ सामन्यांत ३६ विजय मिळवले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. हा त्याचा सलग १३ वा विजय ठरला.
- २१व्या दशकात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना जिंकणारा रोहित हा पाचवा कर्णधार ठरला. याआधी रिडीली जेकब्स, ग्रॅमी स्मिथ, केन विलियम्सन, क्विंटन डी कॉक यांनी हा पराक्रम केला आहे.
- पॉली उम्रीगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाने विजय मिळवणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पॉली उम्रीगर यांनी १९५५/५६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत एक डाव व २७ धावांनी विजय मिळवला होता.