India vs Sri Lanka 1st Test Live Update : भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारत प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा ( Virat Kohli) हा १०० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे विराटचा १०० व कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना अविस्मरणीय करण्यासाठी रोहित सज्ज झाला आहे. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या दोन अनुभवी खेळाडूंशिवाय प्रथमच टीम इंडिया कसोटी मालिकेत उतरणार आहे आणि त्यांची जागा भरून काढणे ही सोपी गोष्ट नाही, याची जाण रोहितलाही आहे.
अजिंक्य व चेतेश्वर यांच्या जागी अंतिम ११ मध्ये शुबमन गिल व हनुमा विहारी ही दोन नावं चर्चेत आहेत. फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर हाही शर्यतीत आहे. पण, रोहितने यापैकी नेमकी कोणाला संधी मिळेल, हे सांगितले नाही. तो म्हणाला,''अजिंक्य आणि चेतेश्वर यांच्या जागी ज्याला कुणाला संधी मिळेल, ती त्याच्यासाठी नवी सुरुवात असेल. या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढणे सोपी गोष्ट नाही. सलामीला कोण खेळेल, याबाबतही ठरवलेलं नाही. सामन्याआधी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. विहारी, मयांक, शुबमन आणि श्रेयस यांना आम्हा सर्वांकडून पूर्णपणे पाठिंबा आहे.''
एक अतिरिक्त फिरकीपटूला खेळवणार?मोहालीची खेळपट्टी आधीसारखीच आहे. खेळपट्टी ड्राय दिसतेय, परंतु ही टिपिकल भारतीय खेळपट्टी आहे आणि येथे फिरकीला साथ नक्की मिळेल.
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)
श्रीलंकेचा कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसंका, लाहिरू थिरिमने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चारिथ असलंका, निरोशन डिक्वेल्ला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे, लसिथ एम्बुल्डेनिया, कुशल मेंडिस (फिटनेस पाहून निर्णय घेणार)
कसोटीचे वेळापत्रकपहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहालीदुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू