Virat Kohli, IND vs SL, 1st Test Live Updates : स्वप्न पूर्ण होतात..!; राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video 

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने आज इतिहास रचला.. भारताकडून १०० कसोटी  सामना खेळणारा तो १२ वा खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:17 PM2022-03-04T12:17:25+5:302022-03-04T12:18:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st Test Live Updates : Moments like these make you feel grateful for where you are. I guess dreams do come true, Virat Kohli tweet goes viral, Video | Virat Kohli, IND vs SL, 1st Test Live Updates : स्वप्न पूर्ण होतात..!; राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video 

Virat Kohli, IND vs SL, 1st Test Live Updates : स्वप्न पूर्ण होतात..!; राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने आज इतिहास रचला.. भारताकडून १०० कसोटी  सामना खेळणारा तो १२ वा खेळाडू ठरला. सुनील गावस्कर ( १९८४), दीलीप वेंगसरकर ( १९८८), कपिल देव ( १९८९), सचिन तेंडुलकर ( २००२), अनिल कुंबळे ( २००५), राहुल द्रविड ( २००६), सौरव गांगुली ( २००७), व्ही व्ही एस लक्ष्मण ( २००८), वीरेंद्र सेहवाग ( २०१२), हरभजन सिंग ( २०१३) , इशांत शर्मा ( २०२१) यांच्या पंक्तित आज विराट कोहली ( २०२२) जाऊन बसला. BCCIतर्फे त्याच्या विशेष सत्कार करण्यात आला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हस्ते हा पुरस्कार दिल्याने विराट अधिक भावूक झाला. 

२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत  ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.  कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत.  भारतासाठी २५० वन डे व १०० कसोटी खेळणारे चार खेळाडू आहेत आणि त्यात आज विराटचा समावेश झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून २५० वन डे व १०० कसोटी खेळणाऱ्या यादीत विराट कोहलीचे नाव लिहिले गेले आहे.  


विराट कोहलीनेही द्रविडचे आभार मानले. तो म्हणाला,''हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी इथे माझ्यासोबत आहे. माझा भाऊ, माझे कुटुंबीय, माझे लहानपणीचे कोच हे सर्व स्टेडियमवर उपस्थित आहेत. खूप अभिमान वाटतोय. सर्व सहकाऱ्यांचे आभार, तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. हा सांघिक खेळ आहे आणि तुमच्याशिवाय हा प्रवास अशक्य आहे. बीसीसीआयचेही आभार, त्यांनी मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली.''

तो पुढे म्हणाला,''ही कॅप यापेक्षा योग्य व्यक्तिकडून मला मिळालीच नसती, तुम्ही माझे बालपणीचे नायक आहात. १५ वर्षांखालील NCAच्या दिवसाच्या तो फोटो अजूनही माझ्या घरात आहे. जेव्हा तुमच्यासोबत फोटो काढत असताना माझे लक्ष तुमच्याकडे होते आणि आज तुमच्याकडून मला १००व्या कसोटीची कॅप मिळतेय.''

पाहा व्हिडीओ... 

Web Title: IND vs SL, 1st Test Live Updates : Moments like these make you feel grateful for where you are. I guess dreams do come true, Virat Kohli tweet goes viral, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.