Join us  

IND vs SL, 1st Test Live Updates : 6, 6, 4, 0, 2, 4; Rishabh Pantची आतषबाजी; विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई, ८ चेंडूत कुटल्या ३२ धावा, Video 

Rishab Pant ; रिषभ पंतने ७५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर पुढील ८ चेंडूंत धावसंख्या ८२ वर घेऊन गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 4:22 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ला ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी आता भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या डावाची वाट पाहावी लागणार आहे. विराट ४५ धावांवर बाद झाला असला तरी त्याने हनुमा विहारीला दिलेली साथ महत्त्वाची ठरली. रिषभ पंत व श्रेयस अय्यर या युवा फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या धावांना गती दिली. सेट झाल्यावर रिषभ त्याच्या नेहमीच्या अंदाजात दिसला आणि त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. 

रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पण, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर रोहित फसला अन् १०व्या षटकात २९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मयांक व हनुमा विहारीने डाव सावरला, परंतु लसिथ इम्बुल्डेनियाने १९व्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. मयांक ३३ धावांवर LBW झाला. त्यानंतर विराट मैदानावर आला. विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला.चांगल्या टचमध्ये दिसलेल्या विराटला श्रीलंकेचा फिरकीपटू इम्बुल्डेनियाने चकवले आणि सरळ चेंडूवर विराटचा त्रिफळा उडाला. 

विहारीने मिळालेल्या संधीचं सोन करताना ९३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, विश्वा फर्नांडोने त्याचा त्रिफळा उडवला.  विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने दमदार खेळ केला. या युवा फलंदाजांनी आक्रमक खेळी करताना  ८८ चेंडूंत  ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर धनंजया डी सिल्वाच्या चेंडूवर LBW झाला. श्रीलंकेने DRS घेतल्यामुळे ही विकेट मिळवली. रिषभ व रवींद्र जडेजा ही जोडी भारताचा डाव सांभाळून होती. रिषभने ७४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटची विकेट घेणाऱ्या इम्बुल्डेनियाच्याने टाकलेल्या ७६व्या षटकात रिषभने   ( 6, 6, 4, 0, 2, 4) तुफान फटकेबाजी करताना २२ धावा कुटल्या. ( Rishabh Pant was 50*(75) and moved to 82*(83) in a Test match.) 

पाहा व्हिडीओ...

  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारिषभ पंत
Open in App