India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : विराट कोहलीची १००वी कसोटी अन् रोहित शर्माचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना पण रिषभ पंतने ( Rishabh Pant) भाव खाल्ला... अर्धशतसाठी ७५ चेंडू खेळून काढणाऱ्या रिषभने पुढील २० चेंडूंत त्याने ४६ धावा कुटल्या. रिषभच्या नेत्रदिपक खेळीला पुन्हा एकदा नजर लागली अन् त्याला शतकाने हुलकावणी दिली. विराट ( Virat Kohli), हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांनी पाया सेट केल्यानंतर रिषभने सुरुवातीला श्रेयस अय्यर आणि नंतर रवींद्र जडेजासह उल्लेखनीय भागीदारी करून भारताला पहिल्या दिवशी वर्चस्व मिळवून दिले. श्रेयससह ५३ धावांच्या भागीदारीनंतर रिषभने सहाव्या विकेटसाठी जडेजासह शतकी भागीदारी केली.
रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पण, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर रोहित फसला अन् १०व्या षटकात २९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. लसिथ इम्बुल्डेनियाने १९व्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. मयांक ३३ धावांवर LBW झाला. विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला. विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या.
रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने दमदार खेळ केला. या युवा फलंदाजांनी आक्रमक खेळी करताना ८८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर धनंजया डी सिल्वाच्या चेंडूवर LBW झाला. रिषभ व रवींद्र जडेजा ही जोडी भारताचा डाव सांभाळून होती. रिषभने ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ७५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रिषभने पुढील ३२ धावा या ८ चेंडूंत चोपल्या. श्रीलंकेचा संघ एवढा बिथरला होता की त्यांनी सलग दोन DRS गमावले. पण, नवा चेंडू हाती येताच त्यांनी रिषभला अखेर बाद केले. सुरंगा अकमलच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला अन् पुन्हा एका रिषभला शतकाने हुलकावणी दिली. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
भारतात त्याची चार शतकं हुकली. तो ९१, ९२, ९२ आणि ९६ धावांवर बाद झाला. एकूण पाचवेळा तो नव्हर्स ९०वर बाद झाला आहे आणि त्याने महेंद्रसिंग धोनीच्या कसोटीत ५ वेळा नव्हर्स ९०च्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३५७ धावा केल्या. जडेजा ४५ तर अश्विन १० धावांवर खेळतोय.
Web Title: IND vs SL, 1st Test Live Updates : Stumps on Day 1, India 357 for 6 , Rishabh Pant with 96 and valuable contribution by Vihari, Jadeja and Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.