Join us  

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadejaच्या विक्रमी कामगिरीनंतर आर अश्विनचा मोठा पराक्रम; श्रीलंका अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे.  पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 5:07 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे.  पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले.  रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. रिषभ पंतचे शतक हुकल्याने निराश झालेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर जडेजाने हास्य फुलवले. जडेजाने आर अश्विन व मोहम्मद शमी यांच्यासह ७व्या व ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या जडेजाने गोलंदाजीतही विकेट घेतली. आर अश्विनने चांगली साथ देताना सर रिचर्ड हॅडली यांच्या विक्रम मोडला. 

पहिल्या दिवसाचा खेळ रिषभ पंतने गाजवला. त्याच्या ९६ धावांची भारताला मजबूत स्थितीत आणले. मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) यांचेही योगदान होतेच. दुसऱ्या दिवसाचा खेळ जडेजाच्या नावावर राहिला. त्याने  आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर  ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.  

c

प्रत्युत्तरात कर्णधार दिमुथ करूणारत्ने व  लाहिरू थिरिमाने यांनी चांगली सुरूवात केली. पण, आर अश्विनच्या जाळ्यात लाहिरू ( १७)  अडकला. त्यानंतर जडेजाने करुणारत्नेला ( २८) पायचीत करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. पथूम निसंका व अँजेलो मॅथ्यूज यांनी श्रीलंकेच्या डावाला आकार देताना शतकी वेस ओलांडली. ३२व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने लंकेच्या निसंकाचा त्रिफळा उडवला अन् जल्लोष झाला. पण, तिसऱ्या अम्पायरने नो बॉल जाहीर करताच सारे नाराज झाले. त्यानंतरच्या षटकात जसप्रीतने त्या न मिळालेल्या विकेटची भरपाई केली. त्याने अनुभवी मॅथ्यूजला ( २२) पायचीत पकडले. आर अश्विनने दुसरा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( १) LBW केले.

आर अश्विनने या विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये ४३२ बळी टिपले आणि त्याने सर रिचर्ड हॅडली यांचा ४३१ बळींचा विक्रम मोडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत ११ वे स्थान पटकावले. श्रीलंकेने दिवसअखेर ४ बाद १०८ धावा केल्या असून ते अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहेत.   

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजाआर अश्विन
Open in App