Join us  

IND vs SL, 1st Test Live Updates : १००व्या कसोटीत विराट कोहलीने रचला इतिहास, थोडक्यात वाचला सुनील गावस्कर यांचा विक्रम!

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 1:09 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंच्या जागी संघात हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली. रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पण, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर रोहित फसला अन् १०व्या षटकात २९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मयांक व हनुमा विहारीने डाव सावरला, परंतु लसिथ इम्बुल्डेनियाने १९व्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. मयांक ३३ धावांवर LBW झाला. 

त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर आला अन् मोहाली स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले. विराट... विराट... विराट... हा जयघोष झाला. विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह अर्धशतकी भागीदारी करून भारताला मजबूत आघाडीच्या दिशेने कूच करून दिली आहे. हनुमाने मिळालेल्या संधीचं सोन करताना ९३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. कसोटीतील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. अजिंक्य व पुजारा यांच्या उपस्थितीत हनुमाला फार कमी संधी मिळाली, परंतु आता त्यांच्या गैरहजेरीत मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं करायचं ठरवलंय. दरम्यान १००वी कसोटी खेळणाऱ्या विराटनेही दमदार खेळ करताना आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. 

भारताकडून कसोटीत ८००० धावा करणारा तो सहवा फलंदाज ठरला. त्याने  १६९ डावांमध्ये हा विक्रम केला. सचिन तेंडुलकर ( १५४ डाव), राहुल द्रविड  ( १५८), वीरेंद्र सेहवाग ( १६०) व सुनील गावस्कर ( १६६ ) यांनी विराटपेक्षा कमी धावांत कसोटीत ८००० धावा केल्या आहेत.

सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ९६०० धावांसह आघाडीवर आहे.  त्यानंतर विराट ( ८०००*), स्टीव्ह स्मिथ ( ७७८४), डेव्हिड वॉर्नर ( ७५८४) आणि केन विलियम्सन ( ७२७२) यांचा क्रमांक येतो.   

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीसुनील गावसकरसचिन तेंडुलकर
Open in App