Virat Kohli Fan Poster Viral: "...तोपर्यंत लग्न करणार नाही"; विराट कोहलीच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा

विराट कोहलीच्या १००व्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:33 PM2022-03-07T12:33:29+5:302022-03-07T12:34:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 1st test Live Updates Virat Kohli Fan declares that he will not get married until this special thing happens holds placard in stadium grabs attention | Virat Kohli Fan Poster Viral: "...तोपर्यंत लग्न करणार नाही"; विराट कोहलीच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा

Virat Kohli Fan Poster Viral: "...तोपर्यंत लग्न करणार नाही"; विराट कोहलीच्या 'जबरा फॅन'ची मैदानातच फलक हाती घेत घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Fan Poster Viral: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध पहिली कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. माजी कर्णधार विराट कोहलीचा हा १००वा कसोटी सामना असल्याने त्याला संघाने विजयी भेट दिली. पण या सामन्यात विराट कोहलीचं शतक पाहायला आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. विराट कोहली दमदार खेळी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याच्या बॅटमधून शतक निघणार असं वाटत होतं. पण दुर्दैवाने ४४ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर भारताला दुसरा डाव मिळालाच नाही. त्यामुळे तब्बल दोन वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून सुरू असलेली विराटच्या शतकाची प्रतिक्षा अद्यापही सुरूच आहे. या दरम्यान, एका चाहत्याच्या हातात असलेल्या फलकाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

विराटने २०१९ साली बांगलादेश विरूद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानात १३६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे सारेच त्याच्या शतकाच्या प्रतिक्षेत आहेत. पण असे असताना विराटच्या एका चाहत्याने आपल्या हातातील फलकामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले.  चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करू शकतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यातच एक नवं उदाहरण समोर आलं. त्या चाहत्याने एका मोठ्या फलकावर लिहिलं होतं की विराट कोहलीने ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्याशिवाय मी लग्न करणार नाही. या चाहत्याचा आणि त्या फलकाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५ धावा आणि रिषभ पंतच्या ९६ धावांच्या दमदार खेळीमुळे भारताने ५७४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर आटोपला. त्यात जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. तर दुसरा डाव १७८ धावांत संपुष्टात आला. त्या डावातही जाडेजा आणि अश्विन यांनी सर्वाधिक प्रत्येकी ४-४ बळी घेतले. जाडेजाला अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

Web Title: IND vs SL 1st test Live Updates Virat Kohli Fan declares that he will not get married until this special thing happens holds placard in stadium grabs attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.