Join us  

Virat Kohli, IND vs SL, 1st Test: आज पदार्पणाचा सामना खेळतोय, असं वाटत होतं; विराट कोहलीचं भावनिक मत

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : रिषभ पंतने ( Rishabh Pant) भारत-श्रीलंका कसोटीचा पहिला दिवस गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:04 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : रिषभ पंतने ( Rishabh Pant) भारत-श्रीलंका कसोटीचा पहिला दिवस गाजवला. त्याने ९६ धावांची खेळी करताना भारताला दिवसअखेर ६ बाद ३ ५७ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराट कोहलीचे १००वे शतक अन् रोहित शर्माचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना पण रिषभ पंतने ( Rishabh Pant) भाव खाल्ला...     अर्धशतसाठी ७५ चेंडू खेळून काढणाऱ्या रिषभने पुढील २० चेंडूंत त्याने ४६ धावा कुटल्या. रिषभच्या नेत्रदिपक खेळीला पुन्हा एकदा नजर लागली अन् त्याला शतकाने हुलकावणी दिली. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर विराट कोहली पत्रकार परिषदेत आला आणि त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला. विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने ८८ चेंडूंत  ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली. 

भारतात त्याची चार शतकं हुकली. तो ९१, ९२, ९२ आणि ९६ धावांवर बाद झाला. एकूण पाचवेळा तो नव्हर्स ९०वर बाद झाला आहे आणि त्याने महेंद्रसिंग धोनीच्या कसोटीत ५ वेळा नव्हर्स ९०च्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३५७ धावा केल्या. जडेजा ४५ तर अश्विन १० धावांवर खेळतोय. 

विराट कोहली काय म्हणाला? 

''मी कधीच  विक्रमांचा विचार केला नाही. मी सातत्याने धावा करतोय आणि महत्त्वाच्या भागीदारींमध्ये माझा वाटा आहे. भारताला जिंकवून देणं, याच विचारातून मी नेहमी मैदानावर उतरतो आणि हे पुढेही कायम राहील. खेळताना आनंद मिळणे महत्त्वाचे आहे आणि मला हे अजूनही तसेच वाटतेय. आज जेव्हा मैदानावर उतरलो तेव्हा मला पदार्पणाचा सामना खेळतोय असे वाटत होते. हे मी राहुल भाईंनाही सांगितले. मैदानावर उतरेपर्यंत मला या यशाची जाणीव झाली नव्हती. पण, जेव्हा मैदानावर उतरलो तो क्षण खास ठरला,''असे विराट म्हणाला.

''कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या.  आता बायो बबलमध्ये राहावं लागतंय, हे लक्षात ठेवावे लागते.  आता पूर्वीसारखं मोकळं वातावरण राहिलेलं नाही आणि ते अधिक आव्हानात्मक बनलं आहे.  १००वी कसोटी खेळणे ही माझीच कसोटी होती आणि आज तो दिवस सरला. कसोटा कारकिर्दीत काहीच सामने दुखापतीमुळे मुकलो,''असेही तो म्हणाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहली
Open in App