Join us  

Virat Kohli 100th Test; IND vs SL, 1st Test Live Updates : विराट कोहलीचा BCCIकडून विशेष सत्कार; अनुष्कासह कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी ही माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १०० वा कसोटी सामना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 9:27 AM

Open in App

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी ही माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. २००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत  ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.  कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत. या यशाबद्दल बीसीसीआयकडून  विराट कोहलीला विशेष भेट देण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्माही ( Anushka Sharma) मैदानावर उपस्थित होती.  

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते ही कॅप देण्यात आली आणि द्रविडने विराटचे कौतुक केले. त्याने २०० कसोटी खेळावेत अशा शुभेच्छाही दिल्या. विराट म्हणाला, हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य येथे उपस्थित आहेत. माझ्या बालपणीच्या नायकाच्या हस्ते मला ही कॅप देण्यात आली त्यासाठी मी बीसीसीआयचे आभार मानतो. 

भारताकडून १०० कसोटी खेळलेले खेळाडू सुनील गावस्कर ( १९८४)दीलीप वेंगसरकर ( १९८८)कपिल देव ( १९८९)सचिन तेंडुलकर ( २००२)अनिल कुंबळे ( २००५)   राहुल द्रविड ( २००६)सौरव गांगुली ( २००७)व्ही व्ही एस लक्ष्मण ( २००८)वीरेंद्र सेहवाग ( २०१२)हरभजन सिंग ( २०१३) इशांत शर्मा ( २०२१)विराट कोहली ( २०२२)

भारतासाठी २५० वन डे व १०० कसोटी खेळणारे चार खेळाडू आहेत आणि त्यात आज विराटचा समावेश झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून २५० वन डे व १०० कसोटी खेळणाऱ्या यादीत विराट कोहलीचे नाव लिहिले गेले आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीअनुष्का शर्माराहुल द्रविड
Open in App