IND vs SL, 1st Test Live Updates : मध्यरात्री १२.४६ वाजता झालेली Virat Kohliच्या बाद होण्याची भविष्यवाणी, व्हायरल ट्विटने उडवलीय खळबळ

Virat Kohli OUT ; १०० कसोटी सामना खेळणारा तो १२ वा भारतीय आणि जगातील ७१ वा खेळाडू ठरला. त्याच्या बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:29 PM2022-03-04T14:29:44+5:302022-03-04T15:43:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st Test Live Updates : Virat Kohli Won't score a 100 in his 100th test, Will score 45 and then Embuldeniya will knock his stumps over, mid night tweet goes viral  | IND vs SL, 1st Test Live Updates : मध्यरात्री १२.४६ वाजता झालेली Virat Kohliच्या बाद होण्याची भविष्यवाणी, व्हायरल ट्विटने उडवलीय खळबळ

IND vs SL, 1st Test Live Updates : मध्यरात्री १२.४६ वाजता झालेली Virat Kohliच्या बाद होण्याची भविष्यवाणी, व्हायरल ट्विटने उडवलीय खळबळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ला ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी आता भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या डावाची वाट पाहावी लागणार आहे. १००व्या कसोटी सामन्यात विराट अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या शतकाचा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. त्याचा आत्मविश्वासपूर्ण खेळ पाहून तो यात यशस्वी होईल असेही दिसत होते, परंतु श्रीलंकेच्या फिरकीपटूने त्याला जाळ्यात ओढले अन् विराटचे शतक लांबणीवर पडले. त्यात विराट आजच्या सामन्यात कसा बाद होईल याचे भाकित केले गेले होते आणि ते तंतोतंत खरे ठरले.   

रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पण, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर रोहित फसला अन् १०व्या षटकात २९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मयांक व हनुमा विहारीने डाव सावरला, परंतु लसिथ इम्बुल्डेनियाने १९व्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. मयांक ३३ धावांवर LBW झाला. 

विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर आला अन् मोहाली स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले. विराट... विराट... विराट... हा जयघोष झाला. विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली.  हनुमाने मिळालेल्या संधीचं सोन करताना ९३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. विराट भारताकडून कसोटीत ८००० धावा करणारा सहवा फलंदाज ठरला. त्याने  १६९ डावांमध्ये हा विक्रम केला. सचिन तेंडुलकर ( १५४ डाव), राहुल द्रविड  ( १५८), वीरेंद्र सेहवाग ( १६०) व सुनील गावस्कर ( १६६ ) यांनी विराटपेक्षा कमी धावांत कसोटीत ८००० धावा केल्या आहेत.  

चांगल्या टचमध्ये दिसलेल्या विराटला श्रीलंकेचा फिरकीपटू इम्बुल्डेनियाने चकवले आणि सरळ चेंडूवर विराटचा त्रिफळा उडाला. ड्रेसिंग रुममध्ये उभ्या असलेल्या रोहितलाही यावर विश्वास बसत नव्हता. विराटची विकेट पडल्यावर तोही डोक्यावर हात ठेऊन आश्चर्यचकित दिसला. त्यापाठोपाठ विहारीही ५८ धावांवर त्रिफळाचीत झाला.  भारताने टी ब्रेकपर्यंत ४ बाद १९९ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर व रिषभ पंत ही नवी जोडी मैदानावर आहे. 

पाहा विराटची विकेट

पाहा व्हायरल झालेलं ट्विट...
''१००व्या कसोटी सामन्यात विराट कोहली शतक बनवू शकणार नाही. तो १०० चेंडूंत चार सुरेख कव्हर ड्राईव्ह लगावून ४५ धावांवर बाद होईल. इम्बुल्डेनियात्याचा त्रिफळा उडवेल,''असं हे ट्विट मध्यरात्री १२.४६ वाजत्या या अकाऊंटवरून केलं गेलं होतं.   

Web Title: IND vs SL, 1st Test Live Updates : Virat Kohli Won't score a 100 in his 100th test, Will score 45 and then Embuldeniya will knock his stumps over, mid night tweet goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.