IND vs SL, 1st Test : श्रीलंकेचा पराभव करून भारताने केली पाकिस्तानची मदत; WTC23 फायनलची शर्यत बनली अधिक किचकट

WTC table रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला, परंतु त्याचा फायदा पाकिस्तानला ( Pakistan) झालेला दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:08 AM2022-03-07T10:08:03+5:302022-03-07T10:08:30+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st Test: The latest WTC23 standings after India’s big win in the first Test, Sri Lanka drop two places down, India in fifth  | IND vs SL, 1st Test : श्रीलंकेचा पराभव करून भारताने केली पाकिस्तानची मदत; WTC23 फायनलची शर्यत बनली अधिक किचकट

IND vs SL, 1st Test : श्रीलंकेचा पराभव करून भारताने केली पाकिस्तानची मदत; WTC23 फायनलची शर्यत बनली अधिक किचकट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL, 1st Test : भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली. रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला, परंतु त्याचा फायदा पाकिस्तानला ( Pakistan) झालेला दिसला. भारताच्या ८ बाद ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात १७४ आणि दुसऱ्या डावात १७८ धावाच केल्या. नाबाद १७५ धावां आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेणाऱ्या जडेजाला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. भारताच्या या विजयाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाले.  

मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७), रिषभ पंत ( ९६), रवींद्र जडेजा ( १७५*) आणि आर अश्विन ( ६१) यांनी दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार अन्य फलंदाज अपयशी ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले.  दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. निरोशन डिकवेला ( नाबाद  ५१) वगळता अन्य फलंदाजांनी  नांगी टाकली. आर अश्विनने ४७ धावांत ४, रवींद्र जडेजाने ४६ धावांत  ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका
या पराभवामुळे श्रीलंकेचा संघाला WTC23 Standings मध्ये अव्वल स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी यावे लागले. ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर सरकले. या पराभवापूर्वी श्रीलंका १०० टक्क्यांमुळे अव्वल स्थानावर होते, परंतु आता त्यांचे ६६.६६ टक्के झाले. भारतीय संघ पाचव्या स्थानावर कायम राहिला आहे. भारताची टक्केवारी ही ५४.१६ इतकी आहे.


 

Web Title: IND vs SL, 1st Test: The latest WTC23 standings after India’s big win in the first Test, Sri Lanka drop two places down, India in fifth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.