IND vs SL, 1st Test : भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली. रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला, परंतु त्याचा फायदा पाकिस्तानला ( Pakistan) झालेला दिसला. भारताच्या ८ बाद ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात १७४ आणि दुसऱ्या डावात १७८ धावाच केल्या. नाबाद १७५ धावां आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेणाऱ्या जडेजाला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. भारताच्या या विजयाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळाले.
मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७), रिषभ पंत ( ९६), रवींद्र जडेजा ( १७५*) आणि आर अश्विन ( ६१) यांनी दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार अन्य फलंदाज अपयशी ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. निरोशन डिकवेला ( नाबाद ५१) वगळता अन्य फलंदाजांनी नांगी टाकली. आर अश्विनने ४७ धावांत ४, रवींद्र जडेजाने ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिकाया पराभवामुळे श्रीलंकेचा संघाला WTC23 Standings मध्ये अव्वल स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी यावे लागले. ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर सरकले. या पराभवापूर्वी श्रीलंका १०० टक्क्यांमुळे अव्वल स्थानावर होते, परंतु आता त्यांचे ६६.६६ टक्के झाले. भारतीय संघ पाचव्या स्थानावर कायम राहिला आहे. भारताची टक्केवारी ही ५४.१६ इतकी आहे.