IND vs SL, 2nd ODI Live: KL Rahulच्या संयमी खेळीला सलाम, कुलदीप, सिराजची कमाल; भारताने जिंकली मालिका 

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) आज रोहित शर्माने संधी दिली अन् चायनामन गोलंदाजाने कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:48 PM2023-01-12T20:48:02+5:302023-01-12T20:48:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd ODI Live: Calm & composed fifty from KL Rahul, Kuldeep Yadav & Mohammed Siraj took 3 wickets each; India won by 4 wickets and 2-0 lead in series   | IND vs SL, 2nd ODI Live: KL Rahulच्या संयमी खेळीला सलाम, कुलदीप, सिराजची कमाल; भारताने जिंकली मालिका 

IND vs SL, 2nd ODI Live: KL Rahulच्या संयमी खेळीला सलाम, कुलदीप, सिराजची कमाल; भारताने जिंकली मालिका 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) आज रोहित शर्माने संधी दिली अन् चायनामन गोलंदाजाने कमाल केली. कुलदीपने श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले अन् भारताच्या अन्य गोलंदाजांनी त्याला साथ दिली. श्रीलंकेच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची साजेशी सुरुवात झाली नाही. पण, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी डाव सावरला अन् भारताचा विजय निश्चित केला. भारताने दुसरी वन डे लढत जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. 

Video: कुलदीप यादवचा 'मिस्ट्री बॉल' अन् श्रीलंकेच्या कर्णधाराची झाली 'दांडी गुल'

कुलदीप व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. अविष्का फर्नांडो ( २०) आणि पदार्पणवीर नुवानिदू फर्नांडो यांनी २९ धावांची सलामी दिली. मोहम्मद सिराजने भन्नाट इनस्विंग चेंडू फेकून अविष्काला त्रिफळाचीत केले. नुवानिदू आणि कुसल मेंडिस ( ३४) यांची चांगलीच जोडी जमली, पण कुलदीपने ही सेट झालेली जोडी तोडली. कुलदीपने फिरकीवर कुसलला ( ३४) LBW केले. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात धनंजया डी सिल्वाचा गोल्डन डकवर त्रिफळा उडवला.  नुवानिदू हा पदार्पणात अर्धशतक झळकावणारा  सहावा श्रीलंकन फलंदाज ठरला. पण, ५० धावांवर विचित्र पद्धतीने तो रन आऊट झाला. 


कुलदीपने त्यानंतर असलंका ( १५) व कर्णधार दासून शनाकाला माघारी पाठवून श्रीलंकेची अवस्था ६ बाद १३३ धावा अशी केली. उम्रान मलिकने श्रीलंकेला दोन धक्के देताना वनिंदू हसरंगा ( २१) व चमिका करुणारत्ने ( १७) यांना मागे पाठवले. सिराजने  शेवटच्या विकेट्स घेत श्रीलंकेला २१५ धावांवर ऑल आऊट केले. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आश्वासक फटके मारले. ईडन गार्डन व रोहित शर्मा यांचे प्रेम साऱ्यांनाच माहीत आहे. रोहितने या मैदानावर अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत आणि हिटमॅनने खणखणीत षटकार खेचून चाहत्यांना आनंदीत केले. पण, चमिका करुणारत्नेने सुरेख चेंडू टाकून रोहितला ( १७) माघारी पाठवले. त्यानंतर पुढील षटकात शुभमनचा ( २१) अनपेक्षित झेल फर्नांडोने टिपला अन् लाहिरू कुमाराला विकेट मिळाली.

दोन्ही ओपनर ४१ धावांवर माघारी परतल्यानंतर मागील सामन्यातील शतकवीर विराट कोहली व श्रेयस अय्यर डाव सारवतील असे वाटत असताना कुमाराने आणखी एक धक्का दिला. विराट ४ धावांवर माघारी परतला. रजिथाने २८ धावा करणाऱ्या श्रेयसला LBW करून भारताला चौथा धक्का दिला. लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांनी श्रीलंकेच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले. या दोघांनी संयमी खेळ करताना ११९ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ५३ चेंडूंत ३६ धावांवर माघारी परतला. विजयासाठी २५ धावांची गरज असताना अक्षर पटेल ( २१) माघारी परतला अन् भारताला सहावा धक्का बसला. लोकेशने आव्हानात्मक परिस्थितीत संयम दाखवताना ९३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

लोकेश १०३ चेंडूंत  ६ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला, कुलदीपने नाबाद १० धावा केल्या. भारताने ४३.२ षटकांत ६ बाद २१९ धावा करून विजय मिळवला. 

Web Title: IND vs SL, 2nd ODI Live: Calm & composed fifty from KL Rahul, Kuldeep Yadav & Mohammed Siraj took 3 wickets each; India won by 4 wickets and 2-0 lead in series  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.