IND vs SL, 2nd ODI Live: कुलदीप यादव, मोहम्मद सिराज चमकले; भारताने पुन्हा श्रीलंकेला रडवले, ३९.४ षटकांत ऑल आऊट केले

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: इतके सामने बाकावर बसवून ठेवलेल्या कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) आज रोहित शर्माने संधी दिली अन् चायनामन गोलंदाजाने कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:39 PM2023-01-12T16:39:17+5:302023-01-12T16:39:35+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd ODI Live: India need 216 runs to win the ODI series against Sri Lanka, mohammed Siraj and Kuldeep yadav take 3 wickets each | IND vs SL, 2nd ODI Live: कुलदीप यादव, मोहम्मद सिराज चमकले; भारताने पुन्हा श्रीलंकेला रडवले, ३९.४ षटकांत ऑल आऊट केले

IND vs SL, 2nd ODI Live: कुलदीप यादव, मोहम्मद सिराज चमकले; भारताने पुन्हा श्रीलंकेला रडवले, ३९.४ षटकांत ऑल आऊट केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: इतके सामने बाकावर बसवून ठेवलेल्या कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) आज रोहित शर्माने संधी दिली अन् चायनामन गोलंदाजाने कमाल केली. श्रीलंकेच्या सेट झालेली जोडी तोडण्यात कुलदीपने महत्त्वाची भूमिका पार पाडताना तीन विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या या कामगिरीमुळे अन्य गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला. मोहम्मद सिराजने तीन विकेट्स, उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत गुंडाळला. 

IND vs SL, 2nd ODI Live: राहुल द्रविडला सामन्यापूर्वी जाणवली 'BP'ची समस्या, जाणून घ्या आता कसा आहे तो

भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा वन डे सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने टीम इंडियामध्ये कुलदीप यादवला स्थान दिले आहे. दुखापतग्रस्त असलेल्या युजवेंद्र चहलला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. पहिल्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान चहलचा खांदा दुखावला होता आणि एका दिवसाच्या विश्रांतीत तो बरा होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली आहे. अविष्का फर्नांडो ( २०) आणि पदार्पणवीर नुवानिदू फर्नांडो यांनी २९ धावांची सलामी दिली. मोहम्मद सिराजने भन्नाट इनस्विंग चेंडू फेकून अविष्काला त्रिफळाचीत केले. 


नुवानिदू सुरेख खेळ करत होता आणि कुसल मेंडिससोबत त्याची चांगलीच जोडी जमली होती. ही जोडी भारताच्या जलदगती गोलंदाजांचा सहज सामना करत होती. रोहितने मग चेंडू फिरकीपटूंच्या हाती दिला. कुलदीप यादवने त्याचे काम चोख बजावले अन् ही सेट झालेली जोडी तोडली. कुलदीपने फिरकीवर कुसलला ( ३४) LBW केले. अम्पायरने बाद दिल्याच्या निर्णायाला कुसलने DRS द्वारे आव्हान दिले. पण, रिप्लेत तिसऱ्या अम्पायरने Umpire Call कायम राखला अन् कुसल नाराज होऊन माघारी परतला. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात धनंजया डी सिल्वाचा गोल्डन डकवर त्रिफळा उडवला.  नुवानिदू हा पदार्पणात अर्धशतक झळकावणारा  सहावा श्रीलंकन फलंदाज ठरला. पण, ५० धावांवर विचित्र पद्धतीने तो रन आऊट झाला.

त्याने मारलेला चेंडू शुभमन गिलने सुरेख फिल्डींग करून रोखला, तोपर्यंत नुवानिदूने क्रिज सोडली होती आणि नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या चरिथ असलंका यांनी त्याला मागे जाण्यास सांगितले. गिलने तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे सोपवला अन् नुवानिदू रन आऊट झाला. कुलदीपने त्यानंतर असलंका ( १५) व कर्णधार दासून शनाकाला माघारी पाठवून श्रीलंकेची अवस्था ६ बाद १३३ धावा अशी केली. उम्रान मलिकने श्रीलंकेला दोन धक्के देताना वनिंदू हसरंगा ( २१) व चमिका करुणारत्ने ( १७) यांना मागे पाठवले. सिराजने  शेवटच्या विकेट्स घेत श्रीलंकेला २१५ धावांवर ऑल आऊट केले.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: IND vs SL, 2nd ODI Live: India need 216 runs to win the ODI series against Sri Lanka, mohammed Siraj and Kuldeep yadav take 3 wickets each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.