India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वन डे सामना (IND vs SL) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, एक बातमी समोर येत आहे की, राहुल द्रविडला रक्तदाबाच्या समस्येमुळे ( बीपी) ( Rahul Dravid Health) काही काळ हॉटेलमध्ये राहावे लागले. राहुल द्रविड टीमसोबत ईडन गार्डन्सवर पोहोचला नव्हता, त्यानंतर त्याच्याबद्दल बातम्या येऊ लागल्या. मात्र, आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकाऱ्यांनी राहुल द्रविडची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर केले असून तो स्टेडियमवर परतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी आज दोन्ही संघ कोलकाता येथील आयटीसी सोनार हॉटेलमध्ये थांबले. सामन्याच्या सुमारे दोन तास आधी दोन्ही संघ बसने स्टेडियमकडे रवाना झाले. त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाच्या बसमध्ये चढला नव्हता, त्याची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. वास्तविक, राहुल द्रविड बीपीच्या समस्येमुळे टीमसोबत स्टेडियममध्ये पोहोचला नाही. मात्र, त्यानंतर त्याला औषध देण्यात आले आणि काही वेळाने तो स्टेडियममध्ये पोहोचला.
द्रविड पूर्णपणे बरा असून तो टीम इंडियासोबत ड्रेसिंग रूममध्ये आला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला औषध देण्यात आले. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेचे ८ विकेट १९९ धावांत तंबूत परतले आहेत. कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या, तर उम्रान मलिकने दोन बळी टीपले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"