Kuldeep Yadav, IND vs SL: 'टीम इंडिया'त स्थान मिळताच कुलदीप यादवची कमाल, केला मोठा पराक्रम

चहलच्या जागी आज कुलदीपला मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:11 PM2023-01-12T17:11:48+5:302023-01-12T17:12:52+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs SL 2nd ODI Live Updates Kuldeep Yadav completes 200 wickets international cricket all formats | Kuldeep Yadav, IND vs SL: 'टीम इंडिया'त स्थान मिळताच कुलदीप यादवची कमाल, केला मोठा पराक्रम

Kuldeep Yadav, IND vs SL: 'टीम इंडिया'त स्थान मिळताच कुलदीप यादवची कमाल, केला मोठा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kuldeep Yadav, IND vs SL 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे. गुवाहाटीच्या वन डे सामन्यात विराट कोहलीचे शतक आणि भारताची शिस्तबद्ध गोलंदाजी यांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. आता कोलकाता येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल केला. कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या जागी दुखापतग्रस्त असलेल्या युजवेंद्र चहलला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. कुलदीपला संघात स्थान मिळाल्यानंतर लगेचच त्याने एका मोठ्या पराक्रमाला गवसणी घातली.

टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादव जेव्हाही संधी मिळेल तेव्हा त्याचा फायदा उठवण्यात कसूर करत नाही. सध्या त्याने संघात स्थान मिळवले आणि महत्त्वाची विकेट घेत खास पराक्रम केला. त्याने विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. आजच्या सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात संघात आलेल्या कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घेतल्या आणि बळींचे द्विशतक पूर्ण केले.

कुलदीपने आजच्या या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून २०० बळी पूर्ण केले. कुलदीपने १०७ सामन्यांत आणि ११० डावांमध्ये हा पराक्रम केला आणि हा टप्पा गाठणारा तो भारताचा २३वा गोलंदाज ठरला. कुलदीपने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२२ विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपला १२२ विकेट्स घेण्यासाठी ७२ डाव खेळावे लागले. यामध्ये दोन हॅट्ट्रिकचा देखील समावेश आहे.

त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी२० मध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपच्या नावावर कसोटीतील १४ डावांत ३४ आणि टी२० च्या २४ डावांत ४४ बळी आहेत. कुलदीपने २५ मार्च २०१७ रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने वन डे आणि टी२० मध्ये पदार्पण केले होते. त्याला २०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी ५ वर्षांच्या कालावधी लागला.

Web Title: Ind vs SL 2nd ODI Live Updates Kuldeep Yadav completes 200 wickets international cricket all formats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.