India vs Sri Lanka 2nd ODI Live Updates: IND vs SL पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने संघात दोन महत्त्वाचे बदल केले. दुखापतग्रस्त वानिंदू हसरंगा आणि नवख्या मोहम्मद शिराजला वगळण्यात आले. त्यांच्या जागी कामिंडू मेंडिस आणि जेफ्री वँडरसे यांना संघात स्थान मिळाले आहे. तर भारताने आपल्या संघात एकही बदल केला नसल्याने यावेळी कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) सांगितले.
दुसऱ्या वनडे साठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
दुसऱ्या वनडे साठी श्रीलंकेचा संघ- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेल्लागे, जेफ्री वँडरसे, अकिला धनंजया, असिथा फर्नांडो
हसरंगा दुखापतीमुळे संघाबाहेर!
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या वनडे सामन्यात आपल्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना हसरंगाच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याला उर्वरित वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. हसरंगा दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकेची गोलंदाजी थोडीशी कमकुवत झाली आहे. कारण त्यांच्याकडे आधीच मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमिरा आणि नुवान तुषारासारखे आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने मालिकेत खेळत नाहीत. त्यात हसरंगाच्या अनुपस्थितीने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Web Title: IND vs SL 2nd ODI Live Updates Sri Lanka won the toss opt to bat first Two changes in the team against Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.