Join us  

Rohit Sharma Washington Sundar Viral Video, IND vs SL: रोहित शर्मा भरमैदानात वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावून गेला... नक्की झालं काय?

Rohit Sharma Washington Sundar Viral Video, IND vs SL 2nd ODI Live Updates: स्लिपमधून रोहित धावत निघाला तेव्हा राहुलही त्याच्याकडे पाहातच राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 7:27 PM

Open in App

Rohit Sharma Washington Sundar Viral Video, IND vs SL 2nd ODI Live Updates: टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या वन-डेमध्ये भारतापुढे २४१ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४० धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने असे काही केले की, भरमैदानात कर्णधार रोहित शर्मा त्याला मारण्यासाठी धावला. याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहित सुंदरवर भडकला?

भारतीय संघाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याची दुसऱ्या वनडे मधील चांगली कामगिरी झाली. त्याने १० षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर आपली गोलंदाजी करत असताना एका षटकात एक प्रसंग घडला. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करताना फलंंदाज काय करतो याचा अंदाज घेत होता. त्यासाठी दोन वेळा वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजाला हुल दिली आणि रन-अप घेऊनही चेंडू टाकलाच नाही. पहिल्या वेळी रोहितने काहीच केले नाही. दुसऱ्यांदा पुन्हा जेव्हा सुंदरने धाव घेऊनही चेंडू टाकला नाही तेव्हा रोहित शर्मा स्लिममधून अतिशय मजेशीर पद्धतीने वॉशिंग्टन सुंदरच्या अंगावर धावून गेला जणू काही तो त्याला मारणारच आहे. सुंदरदेखील या प्रकारानंतर हसला आणि पुढील चेंडू टाकायला आपल्या जागेवर गेला.

असा रंगला श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेने पहिल्याच चेंडूवर पाथुम निसंकाची विकेट गमावली. दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या जोडीने संघाला ७४ धावांची भागीदारी करून दिली. वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी फोडत अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांना सलग दोन षटकांत माघारी धाडले. त्यानंतर अक्षर पटेलने समरविक्रमाला १४ धावांवर, कुलदीप यादवने जनीथ लियानागेला १२ धावांवर तर सुंदरने कर्णधार चरिथ असलंकाला २५ धावांवर बाद केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३५व्या षटकापर्यंत ६ बाद १३६ झाली होती. नंतर दुनिथ वेल्लालागे आणि कमिंडु मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. ७२ धावांची भागीदारी करणाऱ्या दुनिथ वेल्लालागे कुलदीपने ३९ धावांवर तंबूत पाठवले. कमिंडू मेंडिसने ४० धावा केल्या. तर अकिला धनंजया १५ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने ९ बाद २४० धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मावॉशिंग्टन सुंदरभारतीय क्रिकेट संघ