Join us  

IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, रोहितने संघात केला मोठा बदल, पाहा Playing XI

३ सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत १-० ने आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 1:12 PM

Open in App

Rohit Sharma, IND vs SL 2nd ODI Live: भारतीय संघाने तीन वन डे सामन्यातील पहिला सामना जिंकला. आज दुसरा सामना कोलकाता येथे रंगला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल केला असून कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या जागी दुखापतग्रस्त असलेल्या युजवेंद्र चहलला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. पाहा दोनही संघ-

भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज

श्रीलंकेचा संघ- अविष्का फर्नांडो, नुवान फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसून राजिथा

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. भारताकडून पहिल्या सामन्यात टॉप-३ ने मोठा पराक्रम केला. शुबमन गिल ६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. त्याने रोहितसोबत १४३ धावांची भागीदारी केली. रोहितने नंतर फटकेबाजी करत ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. तर विराटने ८७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या साथीने ११३ धावांची खेळी केली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मायुजवेंद्र चहलकुलदीप यादव
Open in App