Join us  

Rohit Sharma, IND vs SL: भारत हरला; पण रोहित शर्माच्या खेळीने केला खास पराक्रम, द्रविडला टाकलं मागे

Rohit Sharma Record, IND vs SL: रोहित शर्माने ५ चौकार, ४ षटकारांच्या मदतीने ठोकल्या ६४ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 10:41 AM

Open in App

Rohit Sharma Record, IND vs SL: पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. जेफ्री वँडरसेने ३३ धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर यजमान श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) यांच्या चिवट खेळीने श्रीलंकेला २४० धावांपर्यंत मजल मारता आली. २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. पण त्याची खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. भारताचा पराभव झाला असला तरी रोहित शर्माने एक पराक्रम केला, मात्र या खेळीच्या बळावर एक विक्रम केला आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने गेल्या दीड-दोन वर्षात धडाकेबाज पद्धतीने खेळ करण्यास सुरुवात केली आहे. कोणतेही पिच असो, रोहित आक्रमक पद्धतीने खेळत राहतो. दुसऱ्या टी२० मध्येही गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहित शर्मा आक्रमक बॅटिंग केली. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा कुटल्या. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना मात्र तो बाद झाला. पण त्याच्या अर्धशतकाने एका मोठा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले.

सामना सुरु होण्याआधी रोहित शर्मा या यादीत पाचव्या क्रमांकावर होता. त्याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे त्याने द्रविडला मागे टाकले. रोहितच्या आता २५६ डावांमध्ये १०,८३१ धावा झाल्या आहेत. राहुल द्रविडने १९९६ ते २०११ या दरम्यान ३४० वनडेमध्ये १०,७६८ धावा केल्या होत्या. रोहितला या वर्षभरात सौरव गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी आहे. गांगुलीच्या नावे सध्या १२,२२१ धावा आहेत. रोहितने ३२९ धावा केल्यास तो गांगुलीलाही मागे टाकेल. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माराहुल द्रविडसौरभ गांगुली