India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला होता आणि तो दुसऱ्या सामन्याला मुकेल की काय अशी शंका निर्माण झाली होती. पण, सामन्यानंतर हार्दिकने ऑल इज वेल असल्याचे सांगितले अन् चाहत्यांना सुटकेचा निश्वास टाकला. पण, भारताचा दुसराच स्टार खेळाडू जायबंदी झाल्याची बातमी समोर येत आहे आणि तो अजूनही मुंबईतच असल्याचे कळतेय... त्यामुळे उद्या पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-२०त त्याची खेळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.
संजू सॅमसन ( Sanju Samson) दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज संजूच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो भारतीय संघासोबत पुण्यात पोहोचला नाही. मुंबईत त्याच्या दुखापतीवर स्कॅन होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात झेल घेण्यासाठी संजूने डाईव्ह मारली होती. त्याने चेंडू पकडला, परंतु तो हातात राखू शकला नाही. हा कॅच घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याला सूज आली असून त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. संजूला पहिल्या सामन्यात ५ धावा करता आल्या होत्या.
हार्दिक पांड्या फिट अँड फाईन...
सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, आम्ही कदाचित हा सामना गमावला असता आणि ते ठिकही होते. युवा खेळाडूंनी या सामन्यात पुनरागमन करून दिले. शिवम मावीला आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना मी पाहिले आहे आणि आज त्याला मी तशीच कामगिरी कर असे सांगितले. तू जास्त धावा दिल्यास तरी मी तुझ्या पाठिशी उभा आहे, असा विश्वास मी त्याला दिला. मला भारतीय संघाला आव्हानात्मक परिस्थितीत टाकायचे होते, कारण मोठ्या सामन्यांसाठी हा अनुभव उपयोगी येणार आहे.
दुखापतीबाबत हार्दिकने म्हटले की,माझा पाय मुरगळला होता, परंतु मी ठिक आहे. दुखापत गंभीर नाही. मी हसतोय म्हणजे सर्वकाही व्यवस्थित आहे, हेच समजा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SL, 2nd T20I : A blow to Team India; The star player stayed in Mumbai due to injury and will miss the second match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.