India vs Sri Lanka 2nd T20I Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची आयती संधी सोडून कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिकने पहिल्या षटकात केवळ ४ धावा दिल्या होत्या. पण, आज पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) नकोशी हॅटट्रिक नोंदवली अन् हार्दिकचा पारा चढला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप सिंग आजच्या सामन्यात खेळणार आहेत आणि संजू सॅमसन व हर्षल पटेल यांना बाहेर बसावे लागले. संजूने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. संजूच्या जागी ऋतुराज गायकवाड व राहुल यांच्यात स्पर्धा होती. पण, हार्दिकने राहुलची निवड केली. राहुल आज पदार्पण करतोय. त्याने आयपीएलच्या ७४ डावांमध्ये २७.६६ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत.
अर्शदीपने त्याच्या पहिल्या व सामन्याच्या दुसऱ्या षटकात सलग तीन नो बॉल टाकले आणि ट्वेंटी-२०त एकाच षटकात नो बॉलची हॅटट्रिक नोंदवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने दुसऱ्या षटकात १९ धावा दिल्या अन् हार्दिकचा पारा चढला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"