India vs Sri Lanka 2nd T20I Live : कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, युझवेंद्र चहलने पहिले यश मिळवून दिले. उम्रान मलिकने ( Umran Malik) पुन्हा एकदा वेगाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने भन्नाट वेगवान चेंडू टाकून भानुका राजपक्षाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर १६व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर त्याने सलग दोन विकेट्स घेतल्या अन् पुढील षटकात तो हॅटट्रिकच्या शोधात होता, परंतु त्याची संधी हुकली. दासून शनाकाने हीच संधी साधली अन् अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. अर्शदीपने आज ५ नो बॉल टाकले अन् त्याचा श्रीलंकेने पुरेपूर फायदा उचलला.
अर्शदीपने त्याच्या पहिल्या व सामन्याच्या दुसऱ्या षटकात सलग तीन नो बॉल टाकले आणि ट्वेंटी-२०त एकाच षटकात नो बॉलची हॅटट्रिक नोंदवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. श्रीलंकेची धावगती रोखण्यासाठी हार्दिकने अक्षर पटेलला आणले आणि त्याने पहिल्या षटकात दोन धावा दिल्या. युझवेंद्र चहलनेही चांगली गोलंदाजी केली अन् श्रीलंकेनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा केल्या. कुसल मेंडिसने २७ चेंडूंत अर्धशतक झळकावले. ट्वेंटी-२० मधील हे त्याचे ११वे अर्धशतक ठरले. ९व्या षटकात युझवेंद्र चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले. मेंडिस ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांवर LBW झाला. भारताचा DRS यशस्वी ठरला. ( India vs Sri Lanka Live Scorecard Click here )
उम्रान मलिकने भन्नाट चेंडू टाकून भानुका राजपक्षाचा ( २) त्रिफळा उडवला. चहलने त्याच्याच गोलंदाजीवर पथुम निसंकाचा झेल सोडला. पण, अक्षर पटेलने ही विकेट मिळवून दिली, राहुल त्रिपाठीने अप्रतिम झेल घेतला. निसंका ३३ धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर आता दोन्ही नवीन फलंदाज होते आणि भारतीय गोलंदाजांना कमबॅक करण्याची हीच ती वेळ होती. अक्षरने श्रीलंकेला चौथा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( ३) बाद केले. उम्रानने १६व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत श्रीलंकेला मोठे धक्के दिले. चरिथ असलंका ( ३७) व वनिंदू हसरंगा ( ०) हे बाद झाले.
अक्षरने २४ धावांत २, चहलने ३० धावांत १ विकेट घेतली. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उम्रान हॅटट्रिकवर होता, परंतु दासून शनाकाने खणखणीत चौकार खेचला. त्या षटकात श्रीलंकेने २१ धावा चोपल्या. उम्रानने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शनाका ३० धावांवर झेलबाद झाला, परंतु अर्शदीपचा तो चेंडू No Ball ठरला. हार्दिकने रागात तोंड झाकून घेतले. शनाकाने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शनाका २२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकार खेचत ५६ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेने ६ बाद २०६ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SL 2nd T20I Live : Umran Malik missed his Hat-trick; 5 no-balls by Arshdeep Singh in a single match, Fifties from Kusal Mendis, Dasun Shanaka powers Sri Lanka to 206/6 in 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.