IND vs SL, 2nd T20I Live Updates : भारताने श्रीलंकेविरूद्ध तुफान फटकेबाजी करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज फटकेबाजी करत भारताविरूद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात १८५ धावांपर्यंत मजल मारली. पाथूम निसांकाच्या ७५, दनुष्का गुणतिलकाच्या ३८ आणि दसून शनाकाच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर लंकेने भारताला १८६ धावांचे आव्हान दिले. लंकेच्या डावात फलंदाजांची फटकेबाजी पाहून रोहितसह सारेच आश्चर्यचकित झाले. डावात रोहितला भारतीय खेळाडूंचं कौतुक करण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण तरीही चहलच्या एका डाईव्हवर रोहितने टाळ्या वाजवून कौतुक केलं.
१३व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. त्यावेळी चेंडू बाऊन्स झाला आणि फलंदाजाने चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारला. त्या ठिकाणी चेंडू वेगाने सीमारेषेवर जात होता. पण युजवेंद्र चहलने चपळाईने चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली. चेंडू त्याच्या हाताने अडला पण तरीही पुढे जाऊन चेंडू सीमारेषेला लागलाच. असं असलं तरी चहलने केलेल्या प्रयत्नाचं रोहितने टाळ्या वाजवून कौतुक केलं. 'हिटमॅन खुश हुआ..' असंच काहीसं दिसून आलं. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, भारताने या आव्हानाचा खरपूस समाचार घेतला. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि रविंद्र जाडेजा यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे महाकाय लक्ष्य असूनही भारताने हे आव्हान अतिशय सहज पार केलं.