IND vs SL, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, विश्वविक्रम रचण्यासाठी बघा कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवली 

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना धरमशाला येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:35 PM2022-02-26T18:35:43+5:302022-02-26T18:39:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma has won the toss and India will bowl first, Team is unchanged   | IND vs SL, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, विश्वविक्रम रचण्यासाठी बघा कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवली 

IND vs SL, 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, विश्वविक्रम रचण्यासाठी बघा कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना धरमशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला दुखापतीमुळे आणखी एक झटका बसला अन् सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Rututraj Gaikwad) याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता तो लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांच्यासह बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


भारताने पहिल्या सामन्यात ६२ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात रोहित व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली होती. रोहित ४४ धावांवर माघारी परतल्यानंतर इशानने ८६ धावांची खेळी साकारली, तर श्रेयस अय्यरने झटपट अर्धशतक झळकावले होते. भारतीय संघात आज दीपक हुडाच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु रोहितने तोच संघ कायम राखला आहे. रोहितने आजचा सामना जिंकल्यास भारताचा ट्वेंटी-२० सामन्यातील हा सलग ११ वा विजय ठरेल आणि ते अफगाणिस्तानच्या वर्ल्ड रिकॉर्डशी बरोबरी करतील.

भारतीय संघ - १. रोहित शर्मा ( कर्णधार), २. इशान किशन ( यष्टिरक्षक), ३. संजू सॅमसन, ४. श्रेयस अय्यर, ५. रवींद्र जडेजा, ६. वेंकटेश अय्यर, ७. दीपक हुडा, ८. भुवनेश्वर कुमार, ९. हर्षल पटेल, १०. जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार) , ११. युझवेंद्र चहल 

Web Title: IND vs SL, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma has won the toss and India will bowl first, Team is unchanged  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.