India vs Sri Lanka: भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी होणारा दुसरा ट्वेंटी-२० सामना स्थगित करावा लागला. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना विलगिकरणात जाण्यास सांगितले अन् त्यांचा RT-PCR रिपोर्ट काढण्यात आला. CriFit ने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार शिखर धवन याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजचा सामना होईल की नाही, यावरही संभ्रमाचे वातावरण आहे. ( Indian captain Shikhar Dhawan has been tested positive for COVID-19)
कृणाल पांड्याच्या संपर्कात टीम इंडियाचे ८ खेळाडू आले होते. या आठ खेळाडूंमध्ये कर्णधार शिखर धवनचाही समावेश आहे. त्यामुळे शिखरसह त्या आठ खेळाडूंना उर्वरित सामन्यांत खेळता येणार नाही, हे स्पष्ट आहे. शिधरसह हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल हे कृणाल पांड्याच्या संपर्कात आले होते. शिखरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी आजचा सामना होणार असल्याचे ANIने स्पष्ट केले.
पण, काही रिपोर्टरच्या माहितीनुसार शिखऱ धवन पूर्णपणे तंदुरुस्त असून तो आजचा सामना खेळणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
Web Title: IND vs SL, 2nd T20I : Shikhar Dhawan Tested COVID-19 Positive, The 2nd T20I will take place in Colombo tonight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.