India vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार कृणालाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले आहे. कृणाल पांड्या पहिल्या ट्वेंटी-20त खेळला होता आणि त्यानं 3 धावा व 1 विकेट घेतली होती. कृणालच्या संपर्कात टीम इंडियाचे 8 खेळाडू आले होते आणि त्यामध्ये पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघांचा इंग्लंड दौराही संकटात आला आहे. ( Prithvi Shaw and Suryakumar Yadav are there in 8 players who are in close contact of Krunal Pandya - all of them are isolated)
इंग्लंड दौऱ्यासाठी पृथ्वी-सुर्याची झाली आहे निवड..अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला उजव्या हाताच्या बोटाच्या दुखापतीवर इंजेक्शन घ्यावे लागले आणि त्याची दुखापत लवकर बरी होईल, याची शक्यता कमी आहे. कौंटी एकादश विरुद्ध टीम इंडिया यांच्यातल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी आवेश खानच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याच्या बोटाला फॅक्चर असल्यामुळे तोही इंग्लंड दौऱ्यावरून माघारी परतणार आहे. सलामीवीर शुबमन गिल मायदेशात परतला आहे. या तीन खेळाडूंना पर्याय म्हणून बीसीसीआयनं पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असलेल्या अभिमन्यूचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं सोमवारीच या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केल्याचे जाहीर केले. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयनं पृथ्वी व सूर्यकुमारची निवड केली.
भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.