Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने बंगळुरू Pink Ball Test साठी मैदानावर उतरले. रोहित शर्माचा ( Rohit Sharma) हा ४०० आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर ( ६६४), महेंद्रसिंग धोनी ( ५३८), राहुल द्रविड (५०९), विराट कोहली ( ४५७), मोहम्मद अझरुद्दीन ( ४३३), सौरव गांगुली ( ४२४), अनिल कुंबळे ( ४०३) यांच्यानंतर भारताकडून ४००+ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ८वा खेळाडू ठरला आहे. रोहितने त्याच्या या विक्रमी सामन्यात चौकाराने धावांचे खाते उघडले, परंतु मयांक अग्रवालच्या विकेटने टीम इंडियाचे धाबे दणाणले.
रोहित व मयांक यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देणे अपेक्षित होतं, परंतु दुसऱ्याच षटकात गोंधळ झाला अन् मयांकला माघारी जावं लागलं. विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर श्रीलंकन खेळाडूंनी मयांकसाठी LBW ची जोरदार अपील केले. मयांक लेग बायवर धाव घेण्यासाठी धावला आणि खेळपट्टीच्या मधोमध येताच रोहितने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तो धावबाद झाला, परंतु चेंडू स्टम्पला लावण्यापूर्वी यष्टिरक्षक डिकवेलाने DRS घेतला. सरतेशेवटी तो NO Ball असल्याचे समोर आले आणि मयांकची अशी विकेट पडली. मयांक ४ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला.
पाहा व्हिडीओ...