IND vs SL, 2nd Test Live Updates : Virat Kohliच्या विनंतीला केराची टोपली; मैदानावर घुसलेल्या त्या फॅन्सना 'जेल'ची हवा, FIR दाखल

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गोंधळ पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:29 PM2022-03-14T15:29:08+5:302022-03-14T15:51:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Live Updates : Four fans who breached the security yesterday at Chinnaswamy Stadium were taken into custody and FIR has been lodged against them. 2 of them are minor  | IND vs SL, 2nd Test Live Updates : Virat Kohliच्या विनंतीला केराची टोपली; मैदानावर घुसलेल्या त्या फॅन्सना 'जेल'ची हवा, FIR दाखल

IND vs SL, 2nd Test Live Updates : Virat Kohliच्या विनंतीला केराची टोपली; मैदानावर घुसलेल्या त्या फॅन्सना 'जेल'ची हवा, FIR दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अचानक काही फॅन्स सुरक्षारक्षकांना चकवून मैदानावर घुसले. त्यापैकी दोघांनी विराट कोहलीसोबत ( Virat Kohli) सोबत सेल्फी काढला. अचानक फॅन्स मैदानावर घुसल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. त्यात विराटने या फॅन्सवर कारवाई करू नका, अशी विनंती केली होती. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार त्या फॅन्सना जेलची हवा खावी लागली आहे आणि FIR ही दाखल झाले आहे. त्यापैकी दोघं ही अल्पवयीन आहेत.

भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात  श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. भारताने दुसऱ्या डावात मयांक ( २२)  व रोहित ( ४६)  यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. रोहित व विहारी ( ३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या.  विराट १३ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा व फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर यांनी ६३ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल ( ९) बाद होताच भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य आहे.  


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तीन प्रेक्षक स्टेडियमवर घुसले. त्यापैकी दोघांना विराटसोबत सेल्फी काढण्यात यश आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षारक्षकही गोंधळले. पण, विराटने या फॅन्सवर कोणतीही कारवाई करू नका असे त्यांना सांगितले होते. 

 

Web Title: IND vs SL, 2nd Test Live Updates : Four fans who breached the security yesterday at Chinnaswamy Stadium were taken into custody and FIR has been lodged against them. 2 of them are minor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.