India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test India won by 238 runs : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. डिसेंबर २०१२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली होती आणि त्यानंतर घरच्या मैदानावर सलग १५ कसोटी मालिका विजय आहे. आतापर्यंत एकाही देशाला घरच्या मैदानावर १०पेक्षा अधिक कसोटी मालिका सलग जिंकता आलेल्या नाहीत. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन्ही डावात ( ५-२४ व ३-२३ ) मिळून ८ विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहची एक कृती विशेष चर्चेत आली.
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने कसोटीतील १४ वे शतक पूर्ण केले. २०१८ पासून कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक २४४८ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा करुणारत्ने हा पहिला सलामीवीर आणि पहिला कर्णधार ठरला आहे. पण, करुणारत्नेचा हा संघर्ष जसप्रीत बुमराहने मोडीत काढला. १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावा करणारा करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताला डाव गुंडाळण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही. दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मॅन ऑफ दी मॅच, तर रिषभ पंतला मॅन ऑफ दी सीरिज हा पुरस्कार देण्यात आला.
जसप्रीतने दुसऱ्या डावात सुरंगा लकमलचा त्रिफळा उडवला. बाद झाल्यानंतर पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या लकमलकडे बुमराह धावत गेला आणि त्याला मिठी मारली. लकमलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यासाठी बुमराहने पुढाकार घेतला. त्यानंतर मयांक अग्रवाल, विराट कोहली, रोहित शर्मा यांनीही लकमलला हात मिळवला. सुरंगाने ६९ कसोटीत १७० विकेट्स घेतल्या आहेत. वन डे व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे १०९ व ८ विकेट्स आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ९२८ धावाही आहेत.
पाहा व्हिडीओ...