IND vs SL, 2nd Test Live Updates : पदार्पणही न झालेल्या खेळाडूच्या हाती Rohit Sharmaने सोपवली ट्रॉफी; कोण आहे हा खेळाडू?, Video

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:36 PM2022-03-14T20:36:49+5:302022-03-14T20:37:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Live Updates : Rohit Sharma hands the trophy to Priyank Panchal and moves aside, know who is he, Video  | IND vs SL, 2nd Test Live Updates : पदार्पणही न झालेल्या खेळाडूच्या हाती Rohit Sharmaने सोपवली ट्रॉफी; कोण आहे हा खेळाडू?, Video

IND vs SL, 2nd Test Live Updates : पदार्पणही न झालेल्या खेळाडूच्या हाती Rohit Sharmaने सोपवली ट्रॉफी; कोण आहे हा खेळाडू?, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन्ही डावात ( ५-२४ व ३-२३ ) मिळून ८ विकेट्स घेतल्या.  दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मॅन ऑफ दी मॅच, तर रिषभ पंतला मॅन ऑफ दी सीरिज हा पुरस्कार देण्यात आला. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) विजयाची ट्रॉफी एका अनोळखी खेळाडूच्या हाती सोपवली. युवा खेळाडूंच्या हाती ट्रॉफी सोपवण्याची परंपरा रोहितनेही कायम राखली, परंतु आज ज्याला ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली त्याचे अजून पदार्पणही झालेले नाही. मग हा खेळाडू आहे तरी कोण?


 भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात  श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. ४४७ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या डावात चांगला खेळ केला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शतकी खेळीने त्यांचे मनोबल उंचावले, परंतु भारतीय गोलंदाजांसमोर ते फार काही करू शकले नाही. १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावा करणारा करुणारत्ने त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताला डाव गुंडाळण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही. 

पाहा व्हिडीओ...
 

कोण आहे हा खेळाडू?

रोहितने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर ग्रुप फोटो घेताना ती युवा खेळाडू प्रियांक पांचाल ( Priyank Panchal) याच्या हाती सोपवली. महेंद्रसिंग धोनीनं ही परंपरा सुरू केली आणि रोहित ती पुढे घेऊन जात आहे. ३१ वर्षीय प्रियांकने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये प्रियांक पांचाल हे खूप मोठे नाव आहे. त्याने १०१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५ पेक्षा अधिकच्या सरासरीने ७०६८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ शतकं व २६ अर्धशतकं आहेत. 

Web Title: IND vs SL, 2nd Test Live Updates : Rohit Sharma hands the trophy to Priyank Panchal and moves aside, know who is he, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.