India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन्ही डावात ( ५-२४ व ३-२३ ) मिळून ८ विकेट्स घेतल्या. दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या मॅन ऑफ दी मॅच, तर रिषभ पंतला मॅन ऑफ दी सीरिज हा पुरस्कार देण्यात आला. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) विजयाची ट्रॉफी एका अनोळखी खेळाडूच्या हाती सोपवली. युवा खेळाडूंच्या हाती ट्रॉफी सोपवण्याची परंपरा रोहितनेही कायम राखली, परंतु आज ज्याला ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली त्याचे अजून पदार्पणही झालेले नाही. मग हा खेळाडू आहे तरी कोण?
पाहा व्हिडीओ...
कोण आहे हा खेळाडू?
रोहितने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर ग्रुप फोटो घेताना ती युवा खेळाडू प्रियांक पांचाल ( Priyank Panchal) याच्या हाती सोपवली. महेंद्रसिंग धोनीनं ही परंपरा सुरू केली आणि रोहित ती पुढे घेऊन जात आहे. ३१ वर्षीय प्रियांकने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये प्रियांक पांचाल हे खूप मोठे नाव आहे. त्याने १०१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५ पेक्षा अधिकच्या सरासरीने ७०६८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ शतकं व २६ अर्धशतकं आहेत.