Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : टीम इंडियाची परिस्थिती 'गंभीर', पण श्रेयस अय्यर उभा राहिला 'खंबीर'; ९२ धावांच्या खेळीनं सावरले

IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्याच दिवसात वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 6:31 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्याच दिवसात वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडले. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अचूक गोलंदाजी करताना भारताला धक्के दिले. खेळपट्टीवर चेंडू टप्पा खालल्यानंतर माती उडत होती. पण, या गंभीर परिस्थितीत श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) खंबीर उभा राहिला आणि दमदार खेळ करताना भारताचा डाव सावरला. 

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  रोहित व मयांक यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देणे अपेक्षित होतं, परंतु तसे घडले नाही. दुसऱ्याच षटकात मयांक रन आऊट झाला. त्यापाठोपाठ रोहितही १५ धावा करून माघारी परतला. विराट व हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी ३१ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर विराट ( २३ ) LBW झाला. 

रिषभ पंतने फटकेबाजी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. त्याचा एक झेलही सोडला गेला. पण, चेंडूची उसळी ओळखण्यात तोही अपयशी ठरला अन् भारताला मोठा धक्का बसला. २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा करणारा रिषभ त्रिफळाचीत झाला. एम्बूल्देनियाच्या चेंडूवर कट मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. रवींद्र जडेजाही फार काळ खेळपट्टीवर टीकला नाही आणि एम्बूल्देनियाने त्यालाही ४ धावांवर बाद केले. श्रेयस अय्यर स्टार ठरला, मुंबईचा खडूसपणा येथे दाखवताना त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने गगनचुंबी षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.

रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी करून श्रेयसने भारताला २०० पार नेले. मोहम्मज  शमीसोबत त्याची जोडी काही फार टीकली नाही. शमी ५ धावांवर बाद झाला. ८२ धावांवर श्रेयसचा सीमारेषेवर झेल सुटला. त्यानंतर त्याने आणखी एक खणखणीत षटकार खेचला. ९१ धावांवर त्याला रन आऊट करण्याची संधी गमावली. पण, पुढच्या षटकात जयविक्रमाने भारताचा डाव गुंडाळला. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यरविराट कोहली
Open in App