Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : Rohit Sharma बाद होताच चिन्नास्वामी स्टेडियमवरील प्रेक्षक नाचू लागले; पाहा असे नेमके काय घडले, Video 

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी सामन्यावर पकड घेतलेली पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:36 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates :  भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी सामन्यावर पकड घेतलेली पाहायला मिळत आहे. भारताचे ६ फलंदाज १४८ धावांवर माघारी परतले आहेत आणि आर अश्विन व श्रेयस अय्यर खिंड लढवत आहेत. विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) हा सामना महत्त्वाचा होता. १००व्या कसोटीत ७१वे शतक करता न आलेला विराट बंगळुरू या त्याच्या दुसऱ्या घरच्या मैदानावर दुष्काळ संपवेल असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. अनपेक्षित चेंडूवर तो LBW होऊन माघारी परतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) बाद झाल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक नाचू लागे. पण, का?

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  रोहित व मयांक यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देणे अपेक्षित होतं, परंतु दुसऱ्याच षटकात गोंधळ झाला अन् मयांकला माघारी जावं लागलं. विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर श्रीलंकन खेळाडूंनी मयांकसाठी LBW ची जोरदार अपील केले. मयांक लेग बायवर धाव घेण्यासाठी धावला आणि खेळपट्टीच्या मधोमध येताच रोहितने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तो ४ धावांवर धावबाद झाला. रोहितलाही ( १५)  फिरकीच्या जाळ्यात ओढून लसिथ एम्बूल्देनियाने स्लीपमध्ये झेलबाद केले. पाहा रोहितची विकेट

रोहित बाद झाल्यानंतर विराटचे आगमन झाले आणि त्याच्या स्वागतासाठी हा जल्लोष होता.  रोहितची विकेट पडलीय याचे त्यांना भानच राहिले नव्हते.     

दरम्यान, विराट व हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. रिषभ पंतने फटकेबाजी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा करणारा रिषभ त्रिफळाचीत झाला. एम्बूल्देनियाच्या चेंडूवर कट मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. रवींद्र जडेजाही फार काळ खेळपट्टीवर टीकला नाही आणि एम्बूल्देनियाने त्यालाही ४ धावांवर बाद केले.     

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहली
Open in App