Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : शतक हुकल्याने निराश, पण...; Shreyas Iyer  दिवसाचा खेळ संपल्यानंतर जे म्हणाला त्यानं जिंकली मनं!, Video 

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:08 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : टीम इंडियाचे आघाडीचे चार प्रमुख फलंदाज ८६ धावांवर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) ने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रेयसच्या ९२ धावांच्या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) , मोहम्मद शमी आणि पुनरागमन करणाऱ्या अक्षर पटेल यांनी कमाल केली. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेचे ६ फलंदाज ८६ धावांवर माघारी परतले आहेत आणि ते अजूनही १६६ धावांनी पिछाडीवर आहेत. Pink Ball Test च्या पहिल्या दिवसाचा नायक श्रेयस अय्यर ठरला. मैदानावरील कामगिरीने अय्यरने सर्वांची मनं जिंकलीच होती, त्यात दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याच्या विधानाने आणखी मनं जिंकली. 

मयांक अग्रवाल ( ४), रोहित शर्मा ( १५), हे झटपट माघारी गेल्यानंतर विराट कोहली व हनुमा विहारी यांनी संघर्ष दाखवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु  ३१ धावांवर,  तर विराट २३ धावांवर बाद झाला. रिषभ पंतने २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला.     

प्रत्युत्तरात उतरलेल्या  श्रीलंकेला तिसऱ्या षटकात धक्का बसला. जसप्रीतने सलामीवीर कुसल मेंडिसचा ( २) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४), लाहिरू थिरीमाने ( ८), धनंजय ( १०) व चरिथ असलंका ( ५) हे बाद झाले. अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज खिंड लढवताना दिसला, परंतु जसप्रीतने त्याला माघारी पाठवले. मॅथ्यूज ४३ धावांवर बाद झाला आणि श्रीलंकेने पहिल्या दिवसअखेर ६ बाद  ८६ धावा केल्या. अजूनही ते १६६ धावांनी पिछाडीवर आहेत.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?मी जेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसून मॅच बघत होतो, तेव्हा प्रत्येक षटकात मला ड्रामा घटताना दिसत होता. त्यामुळे मी आधीच ठरवले होते की बचावात्मक खेळ करणार नाही, कारण त्याने बाद होण्याची संधी बळावेल. त्यामुळेच आक्रमक खेळ करण्याच्या निर्धारानेच मी उतरलो. ८० धावा होईपर्यंत मी शतकाचाही विचार केला नव्हता. जसप्रीत चांगला बचाव करत होता आणि त्यामुळे मला पाचव्या किंवा सहाव्या चेंडूवर एक धाव घ्यावी असेही वाटले नाही, असे श्रेयस म्हणाला.

त्याने पुढे म्हटले की, खेळपट्टी चांगली नव्हती. पहिली पाच षटकं मी नर्व्हस होतो. ब्रेकच्या वेळेस मी कोचसह माझ्या रणनीतीबाबत चर्चा केली आणि सरतेशेवटी मी यशस्वी झालो त्याचा आनंद आहे. शतक हुकल्याने थोडा निराश नक्की झालो, परंतु संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली याचा अधिक आनंद आहे. शतकापेक्षा तेच महत्त्वाचे होते.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यर
Open in App