India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचे ४ फलंदाज २८ धावांवर माघारी परतले आहेत. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. बंगळुरूत भारत-श्रीलंका कसोटी सुरू असताना नजीकच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाने त्यांचा नवा कर्णधाराची घोषणा व नव्या जर्सीच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बंगळुरू हे विराटसाठी दुसरं घर आहे आणि त्यामुळेच मैदानावर RCB... RCB... नावाचा गजर सुरू होता. प्रेक्षकांच्या या प्रेमाला विराटकडूनही प्रतिसाद मिळताना दिसला.
RCBच्या कर्णधारपदासाठी ग्लेन मॅक्सवेलचेही नाव चर्चेत होते. पण, ग्लेन मॅक्सवेल लग्नामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे RCBने आयपीएल २०२२साठी फॅफ ड्यू प्लेसिसची ( Faf Du Plessis) कर्णधार म्हणून निवड केली. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये RCBने ७ कोटी रुपये मोजून फॅफला आपल्या ताफ्यात दाखल केले. फॅफने एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधाराची घोषणा झाल्यानंतर नवी जर्सीही लाँच केली गेली.
विराट टीम इंडियाच्या जर्सीच्या आत RCBची जर्सी घालून मैदानावर उतरला आणि चाहत्यांच्या जयघोषानंतर त्यानं ती जर्सी बाहेर काढून दाखवली.
RCB Full Sqaud - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस ( ७ कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), वानींदू हसरंगा ( १२.२५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), जोश हेझलवूड ( ७.७५ कोटी), शाहबाज अहमद ( २.४० कोटी) , अनुज रावत ( ३.४० कोटी), आकाश दीप ( २० लाख), महिपाल लोमरोर ( ९५ लाख), फिन अॅलेन ( ८० लाख), शेर्फाने रुथरफोर्ड ( १ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ ( ७५ लाख), सुयश प्रभुदेसाई ( ३० लाख), चामा मिलिंद ( २५ लाख), अनीश्वर गौतम ( २० लाख), लवनिथ सिसोदिया ( २० लाख), सिद्धार्थ कौल ( ७५ लाख), कर्ण शर्मा ( ५० लाख), डेव्हिड विली ( २ कोटी).
Web Title: IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Fans chanting RCB, Kohli shows the red inner he’s wearing, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.