IND vs SL, 2nd Test Live Updates : मैं बोल रहा हूँ, DRS ले ले भाई!; Rishabh Pant ने रोहित शर्माला DRSसाठी मनवले अन्... Video 

जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे प्रत्येकी दोन विकेट्स व अक्षर पटेलच्या एका विकेटने ही कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:56 PM2022-03-12T20:56:11+5:302022-03-12T20:56:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : "Main bol raha hoon, DRS le le bhai, Rishabh Pant prodded Rohit Sharma for the review and that proved to be bang on, Watch Video  | IND vs SL, 2nd Test Live Updates : मैं बोल रहा हूँ, DRS ले ले भाई!; Rishabh Pant ने रोहित शर्माला DRSसाठी मनवले अन्... Video 

IND vs SL, 2nd Test Live Updates : मैं बोल रहा हूँ, DRS ले ले भाई!; Rishabh Pant ने रोहित शर्माला DRSसाठी मनवले अन्... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer)  ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या.  प्रत्युत्तरात श्रीलंकेचा निम्मा संघ ५० धावांवर माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे प्रत्येकी दोन विकेट्स व अक्षर पटेलच्या एका विकेटने ही कमाल केली. यापैकी धनंजय डि सिल्वा याची विकेट चर्चेत आली. रिषभ पंत ( Rishabh Pant) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यातल्या संभाषणामूळे ही विकेट चर्चेत आली. 


बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्याच दिवसात वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडले. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अचूक गोलंदाजी करताना भारताला धक्के दिले. खेळपट्टीवर चेंडू टप्पा खालल्यानंतर माती उडत होती. पण, या गंभीर परिस्थितीत श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) खंबीर उभा राहिला आणि दमदार खेळ करताना भारताचा डाव सावरला. 

मयांक अग्रवाल ( ४), रोहित शर्मा ( १५), हे झटपट माघारी गेल्यानंतर विराट कोहली व हनुमा विहारी यांनी संघर्ष दाखवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी ३१ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर विराट ( २३ ) LBW झाला. रिषभ पंतने २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या.  त्यानंतर श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला. दिवस -रात्र कसोटीत भारताकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. विराट कोहलीने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात उतरलेल्या  श्रीलंकेला तिसऱ्या षटकात धक्का बसला. जसप्रीतने सलामीवीर कुसल मेंडिसचा ( २) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४), लाहिरू थिरीमाने ( ८), धनंजय ( १०) व चरिथ असलंका ( ५) हे बाद झाले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर धनंजयासाठी जोरदार अपील झाले. चेंडू धनंजयच्या पॅडवर आदळला. स्लीपमध्ये असलेला रोहित DRS घेण्यासाठी इच्छुक नव्हता, पण रिषभने त्याला तयार केले आणि मग...


पाहा व्हिडीओ...


 

Web Title: IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : "Main bol raha hoon, DRS le le bhai, Rishabh Pant prodded Rohit Sharma for the review and that proved to be bang on, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.