India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा निम्मा संघ ५० धावांवर माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे प्रत्येकी दोन विकेट्स व अक्षर पटेलच्या एका विकेटने ही कमाल केली. यापैकी धनंजय डि सिल्वा याची विकेट चर्चेत आली. रिषभ पंत ( Rishabh Pant) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्यातल्या संभाषणामूळे ही विकेट चर्चेत आली.
मयांक अग्रवाल ( ४), रोहित शर्मा ( १५), हे झटपट माघारी गेल्यानंतर विराट कोहली व हनुमा विहारी यांनी संघर्ष दाखवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी ३१ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर विराट ( २३ ) LBW झाला. रिषभ पंतने २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला. दिवस -रात्र कसोटीत भारताकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. विराट कोहलीने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात उतरलेल्या श्रीलंकेला तिसऱ्या षटकात धक्का बसला. जसप्रीतने सलामीवीर कुसल मेंडिसचा ( २) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४), लाहिरू थिरीमाने ( ८), धनंजय ( १०) व चरिथ असलंका ( ५) हे बाद झाले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर धनंजयासाठी जोरदार अपील झाले. चेंडू धनंजयच्या पॅडवर आदळला. स्लीपमध्ये असलेला रोहित DRS घेण्यासाठी इच्छुक नव्हता, पण रिषभने त्याला तयार केले आणि मग...