IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:08 PM2022-03-13T18:08:30+5:302022-03-13T18:12:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Rishabh Pant becomes the fastest Indian to score a Test fifty, in just 28 balls. Surpasses Kapil Dev's record of 30 balls, Video | IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video

IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : रोहित शर्मा व हनुमा विहारी यांच्या संयमी खेळीनंतर रिषभ पंतच्या वादळी खेळीने चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडले. पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली, तर विहारी ३५ धावांवर माघारी परतला. विराट कोहलीलाही शतकाचा दुष्काळ संपवता आला नाही. पण, रिषभ पंतने ( Rishabh Pant) विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने ४० वर्षांपूर्वी कपिल देव यांनी नोंदवलेला विक्रम मोडला.

जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज ( ४३), निरोशान डिकवेला ( २१) आणि धनंजय डि सिल्वा ( १०) वगळल्यास अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळून भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीतने २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. अश्विन व मोहम्मद शमीने दोन आणि अक्षरने एक विकेट घेतली. 

भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली. मयांक व रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. लसिथ एम्बूल्देनियाने टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला २२ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर रोहित व विहारी यांनी डावाला आकार दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आल्यानंतर रोहितला उत्तुंग फटका मारण्याचा मोह आवरला नाही. धनंजय डि सिल्वाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन त्याने फटका मारला, परंतु तो चुकला याचा अंदाज रोहितच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवला. रोहितला ४६ धावांवर माघारी जावे लागले. विहारीही ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. 

विराट १३ धावांवर  माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ७ चौकार व २ षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता. रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. 
 

भारताकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज  
२८ चेंडू - रिषभ पंत वि. श्रीलंका, बंगळुरू, २०२२
३० चेंडू - कपिल देव वि. पाकिस्तान, कराची, १९८२ 
३१ चेंडू - शार्दूल ठाकूर वि. इंग्लंड, ओव्हल, २०२१
३२ चेंडू - वीरेंद्र सेहवाग वि. इंग्लंड, चेन्नई, २००८ 
 

पाहा व्हिडीओ...

Web Title: IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Rishabh Pant becomes the fastest Indian to score a Test fifty, in just 28 balls. Surpasses Kapil Dev's record of 30 balls, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.