IND vs SL, 2nd Test Live Updates : दोनवेळा बाद असूनही खेळपट्टीवर उभा राहिला, पण तिसऱ्यांदा Hanuma Vihariचा त्रिफळा उडाला, Video 

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड घेण्यास सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:30 PM2022-03-13T17:30:59+5:302022-03-13T17:33:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Second LBW review not taken by Sri Lanka! Vihari would have been out on both occasions, Video  | IND vs SL, 2nd Test Live Updates : दोनवेळा बाद असूनही खेळपट्टीवर उभा राहिला, पण तिसऱ्यांदा Hanuma Vihariचा त्रिफळा उडाला, Video 

IND vs SL, 2nd Test Live Updates : दोनवेळा बाद असूनही खेळपट्टीवर उभा राहिला, पण तिसऱ्यांदा Hanuma Vihariचा त्रिफळा उडाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड घेण्यास सुरूवात केली आहे. मयांक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्मा व हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, १८ धावांच्या फरकाने हे दोघेही माघारी परतले. रोहितला अर्धशतकाने हुलकावणी दिली, तर विहारी ३५ धावांवर माघारी परतला. दोनवेळा बाद असूनही श्रीलंकन खेळाडूंच्या चुकीमुळे विहारी खेळपट्टीवर तग धरून राहिला. 

जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या, परंतु आता पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह टीम इंडिया पुन्हा मैदानावर उतरली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज ( ४३), निरोशान डिकवेला ( २१) आणि धनंजय डि सिल्वा ( १०) वगळल्यास अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळून भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीतने २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. अश्विन व मोहम्मद शमीने दोन आणि अक्षरने एक विकेट घेतली. 

भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली. मयांक व रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. लसिथ एम्बूल्देनियाने टीम इंडियाला पहिला धक्का देताना मयांकला २२ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर रोहित व विहारी यांनी डावाला आकार दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आल्यानंतर रोहितला उत्तुंग फटका मारण्याचा मोह आवरला नाही. धनंजय डि सिल्वाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन त्याने फटका मारला, परंतु तो चुकला याचा अंदाज रोहितच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवला. रोहितला ४६ धावांवर माघारी जावे लागले. विहारीही ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. याआधी दोनवेळा तो पायचीत ( LBW) होता, परंतु श्रीलंकेच्या खेळाडूंनी DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. 

पाहा व्हिडीओ...

Web Title: IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Second LBW review not taken by Sri Lanka! Vihari would have been out on both occasions, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.