India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील १४३ धावांमध्ये भारताने दुसऱ्या दिवशी डिनर ब्रेक पर्यंत २०३ धावांची भर घातली आहे. भारताकडे आता ३४६ धावांची आघाडी झाली आहे. दिवस-रात्र कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) फटकेबाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याने ३१ चेंडूंत ५० धावा चोपल्या. रोहित शर्मा, हनुमा विहारी यांनी ठिकठाक कामगिरी केली. या सामन्यात एक वाईट प्रसंग घडला. पहिल्या डावात रोहित शर्माने गगनचुंबी षटकार खेचला होता आणि तो चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात प्रेक्षक जखमी झाला. विश्वा फर्नांडो याच्या गोलंदाजीवर मारलेला हा षटकाराने प्रेक्षकाला जखमी केले आणि त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २२ वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावर तो चेंडू आदळला आणि रक्त वाहू लागले. प्राथमिक उपचारानंतर त्या युवकाला हॉस्पिटलमध्ये X-Ray साठी नेण्यात आले. त्याच्या रिपोर्टमध्ये त्याच्या अनुनासिक हाड ( Nasal Bone) फ्रॅक्चर झाले आहे आणि नाका शेजारी व्रण झाले आहेत, असे डॉ. अजित रायन यांचा हवाला देऊन सांगण्यात आले आहे.
पाहा रोहितचा माँस्टर सिक्सर...