IND vs SL, 2nd Test Live Updates : जसप्रीतनंतर Rishabh Pant अन् श्रेयस अय्यरची विक्रमी कामगिरी; श्रीलंकेला विजयासाठी सर करावा लागेल धावांचा एव्हरेस्ट

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारताने दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभा करताना श्रीलंकेसमोर अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:50 PM2022-03-13T20:50:17+5:302022-03-13T20:51:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Sri Lanka need 447 runs to win the second Test, stars were Rishabh Pant and Shreyas Iyer with fifties in the second innings | IND vs SL, 2nd Test Live Updates : जसप्रीतनंतर Rishabh Pant अन् श्रेयस अय्यरची विक्रमी कामगिरी; श्रीलंकेला विजयासाठी सर करावा लागेल धावांचा एव्हरेस्ट

IND vs SL, 2nd Test Live Updates : जसप्रीतनंतर Rishabh Pant अन् श्रेयस अय्यरची विक्रमी कामगिरी; श्रीलंकेला विजयासाठी सर करावा लागेल धावांचा एव्हरेस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारत-श्रीलंका दिवस रात्र कसोटीचा दुसरा दिवस जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्स, रिषभ पंतचे वेगवान अर्धशतक अन् श्रेयस अय्यरच्या विक्रमी खेळीने गाजवला. भारताच्या पहिल्या डावातील २५२ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ १०९ धावांत माघारी परतला. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभा करताना श्रीलंकेसमोर अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे. 

जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात मयांक ( २२)  व रोहित ( ४६)  यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा  रोहित व विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या. विहारीही ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. विराट १३ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ७ चौकार व २ षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता.

रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा व फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर यांनी १०१ धावांत ६३ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ९२ धावा करणाऱ्या श्रेयसने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. दिवस रात्र कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला. श्रेयस ८७ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाला. 

दिवस-रात्र कसोटीच्या ( Pink Ball Test) दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा चौथा फलंदाज ठरला. याआधी डॅरेन ब्राव्हो ८७ व ११६ ( वि. पाकिस्तान, दुबई, २०१६), स्टीव्ह स्मिथ १३० व ६३ ( वि. पाकिस्तान, ब्रिस्बेन, २०१६), मार्नस लाबुशेन १४३ व ५० ( वि. न्यूझीलंड, पर्थ, २०१९), मार्नस लाबुशेन १०३ व ५१ ( वि. इंग्लंड, एडलेड, २०२१) यांनी अशी कामगिरी केली आहे.   

मोहम्मद शमीनेही सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अक्षर पटेल ( ९) बाद होताच भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य आहे. 

Web Title: IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Sri Lanka need 447 runs to win the second Test, stars were Rishabh Pant and Shreyas Iyer with fifties in the second innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.