Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : Pink Ball Test च्या पहिल्या दिवशी पडल्या १६ विकेट्स; श्रेयस अय्यरच्या खेळीनं टीम इंडियाची वाचवली लाज

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारतीय संघाने दिवस-रात्र कसोटीचा पहिला दिवस गाजवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 9:13 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारतीय संघाने दिवस-रात्र कसोटीचा पहिला दिवस गाजवला. आघाडीच्या फलंदाजांच्या हाराकिरीनंतर श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) श्रीलंकेच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. त्याच्या   ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या.  त्यानंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) , मोहम्मद शमी आणि पुनरागमन करणाऱ्या अक्षर पटेल यांनी कमाल केली.  

मयांक अग्रवाल ( ४), रोहित शर्मा ( १५), हे झटपट माघारी गेल्यानंतर विराट कोहली व हनुमा विहारी यांनी संघर्ष दाखवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, परंतु प्रविण जयविक्रमाच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी ३१ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर विराट ( २३ ) LBW झाला. रिषभ पंतने २६ चेंडूंत ७ चौकारांसह ३९ धावा केल्या. 

त्यानंतर श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. श्रेयस ९८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ९२ धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवर गडगडला. दिवस -रात्र कसोटीत भारताकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. विराट कोहलीने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात उतरलेल्या  श्रीलंकेला तिसऱ्या षटकात धक्का बसला. जसप्रीतने सलामीवीर कुसल मेंडिसचा ( २) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४), लाहिरू थिरीमाने ( ८), धनंजय ( १०) व चरिथ असलंका ( ५) हे बाद झाले. अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज खिंड लढवताना दिसला, परंतु जसप्रीतने त्याला माघारी पाठवले. मॅथ्यूज ४३ धावांवर बाद झाला आणि श्रीलंकेने पहिल्या दिवसअखेर ६ बाद  ८६ धावा केल्या. अजूनही ते १६६ धावांनी पिछाडीवर आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यरजसप्रित बुमराहमोहम्मद शामी
Open in App