Rohit Sharma in international cricket: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात दुसरी कसोटी लढत शनिवारपासून बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात १ डाव व २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या Pink Ball Test मध्ये माजी कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची सर्वांना प्रतीक्षा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) खेळणाऱ्या विराटचे हे घरचे मैदान आहे. पण, हा सामना कर्णधार रोहित शर्मासाठी ( Rohit Sharma) विशेष महत्त्वाचा आहे. या सामन्यात मैदानावर पाऊल टाकल्यानंतर हिटमॅन रोहित भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आदी दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावणार आहे.
रवींद्र जडेजाची अष्टपैलू ( नाबाद १७५ धावा व ९ विकेट्स) कामगिरी, रिषभ पंतच्या ९६ धावा आणि आर अश्विनच्याही अतुल्य योगदानाच्या जोरावर भारताने पहिली कसोटी जिंकली. आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा ( Axar Patel) समावेश केला गेला आहे आणि कुलदीप यादवला रिलीज करण्यात आले आहे. अक्षरच्या येण्याने बंगळुरू कसोटीत जयंत यादव याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भारतीय संघात काही बदल होतील अशी अपेक्षा नाही
रोहित शर्मा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला खेळेल, त्यानंतर हनुमा विहारी, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन अशी फलंदाजीची क्रमवारी असेल. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे जलदगती माऱ्याची जबाबदारी सांभाळतील.
रोहित शर्माचा आणखी एक विक्रम
रोहित शर्माचा हा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर ( ६६४), महेंद्रसिंग धोनी ( ५३८), राहुल द्रविड (५०९), विराट कोहली ( ४५७), मोहम्मद अझरुद्दीन ( ४३३), सौरव गांगुली ( ४२४), अनिल कुंबळे ( ४०३) आणि युवराज सिंग ( ४०२) यांच्यानंतर भारताकडून ४००+ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ९वा खेळाडू ठरणार आहे.
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्दसामने - ३९९धावा - १५, ६७२सरासरी - ४३.६५शतकं - ४१ अर्धशतकं - ८४