Join us  

IND vs SL, 2nd Test Live Updates : भारताने पाहुण्यांची कोंडी केली; पण, Rahul Dravid, विराट कोहलीच्या 'त्या' कृतीने साऱ्यांची मनं जिंकली, Video 

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारत-श्रीलंका दिवस रात्र कसोटीचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 9:38 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारत-श्रीलंका दिवस रात्र कसोटीचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर राहिला. श्रीलंकेच्या ६ फलंदाजांनी पहिल्याच दिवशी नांगी टाकल्या होत्या आणि त्यानंतर उर्वरित ४ विकेट्स मिळवण्यात भारताला फार कष्ट घ्यावे लागले नाही. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) भारतात प्रथमच डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतर रिषभ पंत (  Rishabh Pant ) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या फटकेबाजीने भारताला मोठे लक्ष्य उभे करून दिले. श्रीलंकेला हे आव्हान पेलणार नाही, हे अटळ आहे आणि त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर १   विकेट गमावली आहे. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid), विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या एका कृतीने लंकन खेळाडूंची मनं जिंकली.     

जसप्रीतच्या पाच विकेट्समुळे पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात मयांक ( २२)  व रोहित ( ४६)  यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. रोहित व विहारी ( ३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या.  विराट १३ धावांवर माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ७ चौकार व २ षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रिषभच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम मागील ४० वर्षे कपिल देव यांच्या नावावर होता. रिषभ ३१ चेंडूंत ५० धावा करून बाद झाला. 

रवींद्र जडेजा व फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर यांनी १०१ धावांत ६३ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ९२ धावा करणाऱ्या श्रेयसने अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. दिवस रात्र कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा पहिला भारतीय ठरला. श्रेयस ८७ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीनेही सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अक्षर पटेल ( ९) बाद होताच भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य आहे. 

दरम्यान, अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या सुरंगा लकमल ( Suranga Lakmal) याला श्रीलंकेच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. तर भारतीय खेळाडूंनी त्याला हस्तांदोलन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीलंकेने दिवसअखेर १ बाद २८ धावा केल्या आहेत आणि विजयासाठी त्यांना ४१९ धावा करायच्या आहेत.    

सुरंगाने ६९ कसोटीत १७० विकेट्स घेतल्या आहेत. वन डे व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे १०९ व ८ विकेट्स आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ९२८ धावाही आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यरराहुल द्रविडविराट कोहलीरिषभ पंत
Open in App